भाजली मासोळी खाण्याच्या वादातून मित्राची हत्या

भाजली मासोळी खाण्याच्या वादातून मित्राची हत्या

आर्वी (जि. वर्धा) : पाच मित्र वर्धानदीच्या काठावर (Wardha River) पार्टी करायला गेले. मनोसोक्त दारु ढोसली. नशा डोक्यात भिनली आणि खात असलेल्या भाजल्या मासोळीवरुन वाद झाला. चौघांनी एकाला मारहाण करून नदीच्या पात्रात बुडवून ठार केले. तब्बल ११ दिवसांनी ही घटना उजेडात आली. याप्रकरणी पोलिसांनी (Wardha Police) चौघांना अटक करून कोठडीत टाकले आहे. (4 men attacked on friend in wardha district)

भाजली मासोळी खाण्याच्या वादातून मित्राची हत्या
नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

मृताचे नाव भारत रामभाऊ काळे (३७ वर्ष) असे असून तो अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील धारवाड येथील रहवासी आहे. तर संजय सुभाष मेश्राम, अजय सुभाष मेश्राम, गड्डु ऊर्फ समीर संतोष साबळे, शरद गुलाब नागपुरे सर्व रा. धारवाड अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारत काळे याला दारूचे व्यसन होते. रविवारी (ता.२३) दुपारी १२ वाजताचे सुमारास तो धारवाडा लगतच्या वर्धा नदीकाठावर संजय मेश्राम व अजय मेश्राम यांच्यासह गेला. यावेळी गुड्डू साबळे, शरद नागपुरे व भारतचा चुलत भाऊ अमोल काळे हे पहिलेच तेथे हजर होते. दारू पिताना भाजल्या मासळ्या खाण्यावरुन संजय मेश्राम व शरद नागपुरे यांच्यात भांडण झाले. यावेळी भारत काळे यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. तर, उलट संजय मेश्राम व शरद नागपुरे हे त्यालाचा शिवीगाळ करू लागले.

यावेळी अमोलने भांडण सोडवीले व तो दुचाकीने गावाकडे परत गेला तर संजय मेश्राम, शरद नागपुरे, अजय मेश्राम, गुड्डू काळे व भरत काळे हे पाच जण नावेत बसुन नदी पलीकडील शिवारात गेले. मात्र, भारत काळे हा परत आला नाही. अमोल काळे हा दुसरे दिवशी संजय मेश्राम याचे घरी गेला तेव्हा त्याने भारत काळेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सागितले. शिवाय ही गोष्ट कुणालाही सांगू नको अन्यथा तुलासुध्दा पाण्यात बुडवुन मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे त्याने याची कुठेच वाच्यता केली नाही.

मंगळवारी (ता.एक) प्रवीण काळे व विनोद खोब्रागडे हे भारत काळे याच्या घरी आले व दोन दिवसापासून वर्धा नदीच्या पात्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. काळे परीवारातील पाच सहा लोकांनी बुधवारी (ता.दोन) टोण-सर्कसपूर शिवार गाठले. पोलिस पाटलाला याची माहिती दिली. ठाणेदार संजय वानखेडे व पोलिस ताफासुध्दा पोहचला. भारत काळे याच्या पत्नीने प्रेताची ओळख पटविली.

असे झाले उघड

संजय मेश्राम याच्या धमकीमुळे चुप असलेला चुलत भाऊ अमोल काळे याच्याने राहावल्या गेले नाही. त्यांने अंत्यविधी झाल्यानंतर धारवाड नदी काठा लगतच्या घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती भारत काळे याच्या पत्नीला दिली आणि संजय मेश्राम, शरद नागपुरे, अजय मेश्राम व गुड्डु काळे यांनीच भरतला मारल्याची माहिती दिली. यामुळे तब्बल ११ दिवसानंतर ही घटना उजेडात आली.

भाजली मासोळी खाण्याच्या वादातून मित्राची हत्या
क्लिनिकल ट्रायल अंतर्गत लहान मुलांना मिळाला लसीचा पहिला डोज

पत्नीच्या तक्रारीवरुन झाला गुन्हा दाखल

भारत काळे याची पत्नी सुर्वणा हिने घटनेची संपुर्ण माहिती लिहुन येथील पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.पाच) दिली. यावरून भादंवीच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हयाची नोंद घेऊन ठाणेदार संजय गायकवाड यांनी चारही आरोपीला अटक करून कोठडीत टाकले.

(4 men attacked on friend in wardha district)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com