esakal | अवघ्या दीड महिन्यात 4 मातामृत्यू  व 20 बालमृत्यू?
sakal

बोलून बातमी शोधा

4 mothers and 20 children died in 45 days?

तालुक्‍यातील पोहना येथील उर्मिला अज्जू अखंडे (वय 20) या मातेचा प्रसूतीदरम्यान सोमवारी मृत्यू झाला. या महिलेची प्रसूती ग्रामीण रुग्णालय चिखलदरा येथे रात्री अडीचच्या दरम्यान झाली. तिने मृत बाळाला जन्म दिला. दरम्यान, प्रकृती खालावल्याने तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सोमवारी सकाळी साडेसात वाजेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवघ्या दीड महिन्यात 4 मातामृत्यू  व 20 बालमृत्यू?

sakal_logo
By
नारायण येवले

चिखलदरा (जि.अमरावती)  : महाशक्तीकडे वाटचाल करणा-या भारतात माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.  मेळघाटात बालमृत्यू व मातामृत्यूंचे तांडव सुरूच आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा शासन वेळोवेळी आव आणत असले तरी मेळघाटात मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याची धक्कादायक माहिती पुन्हा पुढे आली आहे. 

अवश्य वाचा- मोबाईल एज्युकेशन मुलांसाठी ठरतेय घातक, वाचा कसे काय? 

दरम्यान, तालुक्‍यातील पोहना येथील उर्मिला अज्जू अखंडे (वय 20) या मातेचा प्रसूतीदरम्यान सोमवारी मृत्यू झाला. या महिलेची प्रसूती ग्रामीण रुग्णालय चिखलदरा येथे रात्री अडीचच्या दरम्यान झाली. तिने मृत बाळाला जन्म दिला. दरम्यान, प्रकृती खालावल्याने तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सोमवारी सकाळी साडेसात वाजेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, शासनाकडून दरवर्षी गरोदर मातांसाठी सकस आहार व स्तनदा मातांसह कुपोषित बालकांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु मातामृत्यू तसेच बालमृत्यूची मालिका आटोक्‍यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. 

चौकशीचे आदेश

माता व बालमृत्यूच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी चौकशी करून अहवाल सादर करतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

48 दिवसांत 24 मृत्यू

मेळघाटच्या चिखलदरा व धारणी तालुक्‍यात 1 एप्रिल ते 18 मे 2020 पर्यंतच्या कालावधीत चार मातामृत्यू व 20 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. यातील तीन मातामृत्यू धारणी तालुक्‍यातील आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.