नववीतील ४० टक्के विद्यार्थी नापास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

अनुदानासाठी शहरातील अल्पसंख्याक शाळांचे कारस्थान 

नागपूर - दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्यास शासनाकडून अनुदान मिळते. ते लाटण्यासाठी शहरातील अल्पसंख्याक शाळांनी किमान अध्ययन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करून त्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अशा शाळांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, अनुतीर्ण विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्याची ताकीद दिली.

नागपूर विभागातर्फे नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दीड महिना शिकवून त्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, उन्हाळ्यांच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून शाळांनी अंग काढले. त्यामुळे नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीत प्रविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. यात अल्पसंख्याक शाळा अग्रक्रमावर आहेत. नापास विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज करण्याचा सल्ला शाळांकडून देण्यात येतो, ही बाब लक्षात येताच जून महिन्याच्या आधी शाळा सोडल्याचा दाखला जोडणाऱ्या विद्यार्थ्यांनाच १७ नंबरचा अर्ज करता येईल अशी अट शिक्षण विभागाने घातली. त्यामुळे पालकांनी शाळांवर रोष व्यक्त केला. त्यामुळे शाळांची गोची झाली. इयत्ता नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत आणून त्यांना उत्तीर्ण करण्याचे काम शाळा करीत आहेत.

Web Title: 40 percent of students failed 9th Standerd