esakal | बहुत नाइन्साफी है! स्टेशन एक अन् गावं चाळीस; सोबतीला महामार्गसुद्धा 
sakal

बोलून बातमी शोधा

40 villages are in range of Talegaon police station in wardha district

काही वर्षांपूर्वी तळेगाव येथे पोलिस चौकी कार्यरत होती.  यामुळे चौकीच्या गावांची संख्याही कमी होती. पण 2013 मध्ये या पोलिस चौकीचे ठाण्यात रूपांतर झाले.

बहुत नाइन्साफी है! स्टेशन एक अन् गावं चाळीस; सोबतीला महामार्गसुद्धा 

sakal_logo
By
दीपक चौधरी

तळेगाव (जि.वर्धा) : आर्वी, आष्टी, कारंजा तहसीलच्या काही गावांचा समावेश अमरावती महामार्गावरील तळेगाव शामजीपंत पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे. यामुळे या पोलिस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. या पोलिस ठाण्याची हद्द कारंजा, आर्वी, आष्टी या तीन तहसीलमधील काही खेड्यापर्यंत वाढविण्यात आली असून या तीन तहसीलमधील एकूण 40 गावांच्या सुरक्षेची जबाबदारी या पोलिस ठाण्यावर आहे. 

हेही वाचा - सावधान! एसटीमध्ये चोरट्यांची टोळी सक्रिय; प्रवासी दाम्पत्यास...

काही वर्षांपूर्वी तळेगाव येथे पोलिस चौकी कार्यरत होती.  यामुळे चौकीच्या गावांची संख्याही कमी होती. पण 2013 मध्ये या पोलिस चौकीचे ठाण्यात रूपांतर झाले. यामुळे या पोलिस ठाण्याचा विस्तारही वाढला. परंतु, या पोलिस ठाण्याचे काम सध्या ब्रिटिश कालीन तुटलेल्या इमारतीत सुरू  आहे. गावातून दीड किलोमीटर अंतरावर अमरावती मार्गावर पोलिस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. 

तळेगाव पोलिस ठाण्याअंतर्गत गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासह गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत. सारवाडी भिवापूर, पारडी, एकंबा, किन्हाळा, जसापूर, मालेगाव (काळी), रानवाडी, सावळी खुर्द, पालोरा, चिंचोली, 10 गावे आणि आर्वी तालुक्‍यातील वर्धमनेरी, जळगाव, परतोडा, कोपरा पुनर्वसन, खानवाडी  तर आष्टी तालुक्‍यातील 25 गावांचा कारभार येथून सुरू आहे. या सर्व गावांची एकूण लोकसंख्या 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त आहे. यातही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या गावातील नागरिकांना सेवा देण्यास पोलिस प्रशासन कमी पडत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

जाणून घ्या - केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल म्हणाले, ‘३ डी’चा वापर करून देश आत्मनिर्भर करा

पोलिस ठाण्यात 104 कर्मचारी 

तळेगाव पोलिस ठाणे मंजूर झाले त्या काळापासून येथे 104 पोलिस कर्मचारी आहेत. यात सध्या 44 पोलिस कर्मचारी थेट कार्यरत आहेत.  एक सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, जमादार आठ, शिपाई 20, महिला पोलिस 5 आणि नाईक पोलिस नऊ असल्याचे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांना या 40 गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ