प्रशासन हादरले! अमरावतीत कोरोना रुग्णांचा उच्चांक, मृत्यूही वाढले

सुधीर भारती
Thursday, 18 February 2021

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतसुद्धा चिंतनीय वाढ झाली आहे.

अमरावती : कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी (ता.17) पुन्हा एक नवीन उच्चांक स्थापित केला. बुधवारी तब्बल 498 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन पुरते हादरले असून प्रतिबंध आणखी कठोर होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतसुद्धा चिंतनीय वाढ झाली आहे. बुधवारी विविध प्रयोगशाळांच्या अहवालावरून जिल्ह्यात 498 रुग्णांची नोंद झाली आहे. सहा जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे.     

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

होम आयसोलेशन कठोर करणार -
आतापर्यंत आढळून आलेल्या जवळपास 90 टक्के कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याची सवलत देण्यात आली होती. मात्र, अनेकांनी या सवलतीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनऐवजी रुग्णालयात उपचार करण्यासाठी बाध्य केले जाणार असल्याचे समजते. 

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो, शाळा-महाविद्यालयात येऊ नका! संस्थांचे...

असा आहे कोरोनाचा चढता ग्राफ -

 • 1 फेब्रुवारी 92
 • 2 फेब्रुवारी 118
 • 3 फेब्रुवारी 179
 • 4 फेब्रुवारी 158
 • 5 फेब्रुवारी 233
 • 6 फेब्रुवारी 199
 • 7 फेब्रुवारी 192
 • 8 फेब्रुवारी 236
 • 9 फेब्रवारी 183
 • 10 फेब्रुवारी 359
 • 11 फेब्रुवारी 315
 • 12 फेब्रुवारी 369
 • 13 फेब्रुवारी 376
 • 14 फेब्रुवारी 399
 • 15 फेब्रुवारी 449
 • 16 फेब्रुवारी 485
 • 17 फेब्रुवारी 498
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 498 new corona cases found in amravati