पावसामुळे विदर्भात 50 कोटींचा चुराडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

नागपूर - चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे कामही गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने केले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे हा आकडा 50 कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पाचजण पुरात वाहून गेले तर अनेक गुरढोरे बेपत्ता झाले आहेत. 

भंडारा जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पवनी तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील पिके वाहून गेली तर सावरला-पवनी मार्ग नदीला आलेल्या पुरामुळे बंद होता. खातखेडा, गुडेगाव येथील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लाखांदूर तालुक्‍यातील किन्ही येथील गणेश दाणी यांचा गुरांचा गोठा पावसामुळे पडला. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर शेडगाव येथील दहा शेतमजुरांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. शुक्रवारी शेतात कामावर गेलेल्या मजुरांना अचानक आलेल्या पुरामुळे शेतशिवारात रात्र काढावी लागली. तर 150 पेक्षा जास्त जनावरे बेपत्ता झाली आहेत. 

नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी पाचगाव ते खापरी रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने दुचाकीस्वार दामोदर श्रीपत कापसे (वय 35) या तरुणाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. शनिवारी (ता. 7) सकाळी नऊच्या सुमारास त्याचा मृतदेह पुराचे पाणी कमी झाल्यावर शोधला. नागपूर शहरातही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते, तसेच दोघेजण वाहून गेले. सर्वाधिक फटका बेसा, बेलतरोडी आणि झोपडपट्टी भागांमध्ये बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा आणि राजुरा तालुक्‍यातील दोघांचा नदीत वाहून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह सापडला आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे. 150 घरे पाण्याखाली होती तर 25 शेळ्या वाहून गेल्या. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील काही घरांची पडझड झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

Web Title: 50 crore loss due to rain in Vidarbha