पावसामुळे 50 कोटींचा चुराडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नागपूर - चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणण्याचे कामही गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने केले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे हा आकडा 50 कोटींपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे; तसेच पाच जण पुरात वाहून गेले; तर अनेक गुरढोरे बेपत्ता झाली आहेत. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पवनी तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील पिके वाहून गेली; तर सावरला-पवनी मार्ग नदीला आलेल्या पुरामुळे बंद होता.

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर शेडगाव येथील दहा शेतमजुरांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. शुक्रवारी शेतात कामावर गेलेल्या मजुरांना अचानक आलेल्या पुरामुळे शेतशिवारात रात्र काढावी लागली; तर 150 पेक्षा जास्त जनावरे बेपत्ता झाली आहेत.

Web Title: 50 Crore loss by rain