esakal | क्या बात है! पोलिसांना प्रत्येकी 50 हजारांचा रिवॉर्ड; नयन लुणीया केसमध्ये कौतुकास्पद कामगिरी केल्याबाबत बंपर बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

50 thousand reward announced to Amravati police by Commissioner

यापूर्वी राज्यात खंडणीसाठी तीन चिमुकल्यांचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांचा काही कालावधीनंतर खून केला होता. अमरावती येथील नयनच्या बाबतीत तसा काही प्रसंग ओढवू नये म्हणून पोलिसांनी मेहनत घेऊन आवश्‍यक ती काळजी घेऊन नयनची सुखरूप सुटका केली. पोलिस आयुक्तालयासाठी ही अभिमानाची बाब ठरली. 

क्या बात है! पोलिसांना प्रत्येकी 50 हजारांचा रिवॉर्ड; नयन लुणीया केसमध्ये कौतुकास्पद कामगिरी केल्याबाबत बंपर बक्षीस

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती :  नयन लुणीया या चिमुकल्याच्या अपहरणप्रकरणी शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी या महत्त्वपूर्ण तपासात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला.

यापूर्वी राज्यात खंडणीसाठी तीन चिमुकल्यांचे अपहरण करणाऱ्यांनी त्यांचा काही कालावधीनंतर खून केला होता. अमरावती येथील नयनच्या बाबतीत तसा काही प्रसंग ओढवू नये म्हणून पोलिसांनी मेहनत घेऊन आवश्‍यक ती काळजी घेऊन नयनची सुखरूप सुटका केली. पोलिस आयुक्तालयासाठी ही अभिमानाची बाब ठरली. 

हेही वाचा - ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त; दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘...

अमरावती पोलिसांच्या प्रयत्नाला अहमदनगर पोलिसांचे सहकार्य लाभले. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनाही रिवॉर्डची रक्कम पाठविल्या जाईल, असेही सीपींनी या वेळी सांगितले. खंडणीसाठी अपहरण केलेल्या यश कटारिया, यूग चांडक या चिमुकल्यांची अपहरणकर्त्यांनी हत्याच केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. समाजातसुद्धा त्याचे तीव्र पडसाद उमटले. 

या सर्वच बाबी नयन प्रकरणाचा तपास करताना डोळ्यांपुढे होत्या. आयुक्तालयातील सायबर पोलिस, गुन्हेशाखा, राजापेठ पोलिस, अहमदनगर पोलिस हे सर्वच बक्षिसासाठी पात्र ठरले. आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच पोलिस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तपासात प्रोत्साहन मिळावे, याकरिता बंपर बक्षीस जाहीर केले. 

नक्की वाचा - दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या भावाची काठीने वार करून हत्या

त्यासंदर्भात सीपींना विचारले असता बक्षीस पहिल्यांदा घोषित झाले, ही बाब खरी आहे. पण अशाप्रकारची घटनाही तर पहिल्यांदा घडली. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करताना तारेवरची कसरत करावी लागली, ही बाब सीपींनी आवर्जून सांगितली.

संपादन - अथर्व महांकाळ