50 हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त

अनिल दंदी 
बुधवार, 18 जुलै 2018

शहरातील अकोट फैल येथील भोईपुरा व अांबेडकर चौक या दोन्ही ठिकाणी अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलीसांनी धाड टाकून 50 हजार रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे.
 

अकोला: शहरातील अकोट फैल येथील भोईपुरा व अांबेडकर चौक या दोन्ही ठिकाणी अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याच्या गुप्त माहिती वरून पोलीसांनी धाड टाकून 50 हजार रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे.

ठाणेदार आर. जे. भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रकाश चौधरी, छोटू पवार, दिलीप इंगोले, संतोष बागडे, राहुल चौहान, यांनी छापा मारत कार्रवाई केली.  या कारवाईत दिनेश सदाशिव चौधरी याच्या जवळून 44 हजार 912 तर, महेश सूर्यकुमार श्रीवास्तव यांच्या जवळून 4 हजार 622 रुपयांसह 49 हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: 50 thousand rupees illegal gutkha seized in akola

टॅग्स