पन्नाशीतही प्रेमवेड, तरूणीवर हल्ला करून आत्महत्या

deadbody
deadbody

पातूर/विवरा (अकोला) : अवघ्या अठरा वर्षाच्या तरुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या 50 वर्षीय इसमाने तिच्यावर शस्त्राने हल्ला करुन स्वतःचेही जीवन संपविल्याची थरारक घटना साेमवारी (ता. 19) घडली. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतशिवारात घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

पन्नाशी गाठलेल्या या प्रेमविराचे नाव नियामत खाँ सुजात खाँ (वय 50) असून ताे खामगाव तालुक्यातील बाेथा गावचा रहिवाशी आहे. विवरा येथील अवघ्या 18 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात आेढून त्याने सात महिन्यापूर्वी तिला पळवून नेले. नंतर दाेघांमध्ये वाद झाला, आणि ती विवरा येथे आईवडिलांकडे परत आली. साेमवारी आई व बहिणीसह ही तरुणी स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली असता, तेथे नियामत खाँ सुजात खाँ पाेहचला. मारण्याच्या उद्देशाने त्याने तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी हाेऊन खाली पडली. आजुबाजूच्या लाेकांनी हे दृश्य पाहून आरडाआेरडा केला असता ताे घाबरला आणि त्याने गळा चिरुन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी .सी खंडेराव, चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे उपनिरीक्षक जयसिंग पाटील व बाळापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. चान्नी व पातुर पोलिसांनी नियामत खाँचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com