esakal | कोरोना रोखण्यासाठी काटेरी कुंपण; विनाकारण फिरल्यास पाचशे रुपये दंड

बोलून बातमी शोधा

कोरोना रोखण्यासाठी काटेरी कुंपण; विनाकारण फिरल्यास पाचशे रुपये दंड
कोरोना रोखण्यासाठी काटेरी कुंपण; विनाकारण फिरल्यास पाचशे रुपये दंड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जांभुळघाट (जि. चंद्रपूर) ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मृत्यूदरही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी तालुक्‍यातील बोडदा ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवर काटेरी कुंपण लावले आहे. बाहेरील व्यक्तीस प्रवेशबंदी आहे. गावात विनाकारण कुणी फिरताना दिसल्यास त्याच्याकडून पाचशे रुपये दंडही आकारला जात आहे.

हेही वाचा: मरणापेक्षा मासे महत्त्वाचे; गडचिरोलीतील मासळी बाजारात खरेदीसाठी तुफान गर्दी

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ऑक्‍सिजनअभावी बाधित दगावत चालल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. शहर, तालुक्‍यात बेड मिळणे कठीण झाले आहे. प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केली. चिमूर तालुक्‍यातील बोडदा ग्रामपंचायतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावाच्या वेशीवर काटेरी कुंपण लावले आहे. गावाच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

तालुक्‍यातील बोडदा हे दोन हजार लोकसंख्येचे गाव. नऊ सदस्य संख्या या ग्रामपंचायतीची आहे. या गावात अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत गावातील कुणी बाधित होऊ नये, दुसऱ्या गावातील व्यक्ती गावात येऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवरच काटेरी कुंपण लावले आहे. बाहेरच्या गावातील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. गावात विनाकारण कुणी फिरताना दिसल्यास त्याच्यावर दंड आकारण्यात येतो.

संपादन - अथर्व महांकाळ