कृषी विभागातील 54 अधिकाऱ्यांचे स्थानांतरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

अमरावती : कृषी विभागातील तंत्र अधिकारी (वर्ग-2) दर्जाच्या 54 अधिकाऱ्यांचे सोमवारी (ता. 12) स्थानांतरण करण्यात आले. पैकी बहुतेक अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावरून कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली. 

अमरावती : कृषी विभागातील तंत्र अधिकारी (वर्ग-2) दर्जाच्या 54 अधिकाऱ्यांचे सोमवारी (ता. 12) स्थानांतरण करण्यात आले. पैकी बहुतेक अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावरून कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात आली. 

विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात अकार्यकारी पदांवर असलेल्यांपैकी एक-दोघांचा अपवाद वगळता जवळपास सर्वांनाच तालुका कृषी अधिकारी या कार्यकारी पदावर तसेच शक्‍यतोवर त्याच जिल्ह्यात रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली. राज्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे कठीण जात असल्याचे कारण सांगत राज्याचे अवर सचिव उमेश मदन यांनी उपरोक्त बदली आदेश सोमवारी निर्गमित केला. त्यानुसार (कंसात कोठून-कोठे) सारिका श्‍यामराव रेपे (नागपूर-पुणे), पठाण शेरन ताजमोहम्मद (गडचिरोली-जाफ्राबाद, जि. जालना), नामदेव रघुजी कुमारे (पुसद-उमरखेड), दीपक काशिराम तायडे (अकोला-बार्शीटाकळी), ज्ञानदेव मिलिंद वानखेडे (वाशीम-तेल्हारा), बिपिनकुमार गुलाबराव राठोड (बुलडाणा-लोणार), एन. के. राऊत (खामगाव-मलकापूर), सत्येंद्र रामचंद्र चिंतलवाड (बुलडाणा-मेहकर), सुप्रिया रमेश शिडीमकर (अमरावती-अमरावती), विवेक पांडुरंग टेकाडे (अचलपूर-तिवसा), चंद्रकांत ठाकरे (गडचिरोली-गडचिरोली), संजय वाकडे (अहेरी-अहेरी), एन. एम. धोंगडे (राजुरा-ब्रह्मपुरी), ए. व्ही. भारती (नागभीड-नागभीड), प्रकाश वाल्मीक राजाराम (वरोरा-वरोरा), खान मोहम्मद जहूर अहमद (साकोली-तुमसर), अमरज्योती तात्याराव गच्छे (रामटेक-पारशिवनी), महेश वसंत परांजपे (आर्वी-हिंगणा), मंजूषा रामराव राऊत (नागपूर-कामठी), आर. व्ही. चेनशेटी (वर्धा-देवळी), माधुरी रमेश गायकवाड (हिंगणघाट-हिंगणघाट), लिखनदास एच. बनसोड (देवरी-आमगाव) अशारीतीने विदर्भातील तंत्र अधिकाऱ्यांना पोस्टिंग देण्यात आली. 

कृषी विभागाने यापूर्वी 1 फेब्रुवारीला राज्यातील "आत्मा'च्या प्रकल्प संचालक 11 अधिकाऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या समकक्ष रिक्त पदावर नियुक्ती दिलेली होती. कृषी विभागात तंत्र अधिकाऱ्यांच्या बदलीची ही यादी चार ते सहा महिन्यांपासून विचाराधीन होती. त्यावर आजअखेर शिक्कामोर्तब झाले. 
 

Web Title: 54 officers of agriculture department transferred