राष्ट्रवादीतर्फे शहरातून लाढण्यास 55 इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नागपूर : शहर, जिल्ह्यातील काटोल आणि हिंगणा विधानसभा मतदारसंघ वगळून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दहा मतदारसंघातील 82 कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. यात शहरातील 55 तर ग्रामीणमधील 27 जणांचा समावेश आहे.
मुलाखतीसाठी प्रदेशच्या वतीने समिती स्थापन केली होती. यात माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, हर्षवर्धन देशमुख, राजेंद्र जैन, धनंजय दलाल यांचा समावेश होता. यावेळी शहराध्यक्ष अनिल अहीरकर व ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते.

विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्‍चित झाली आहे. दोन्ही कॉंग्रेसला त्याशिवाय गत्यंतरसुद्धा नाही. अडचण फक्त जागा वाटपाची आहे. आजवर शहरात कॉंग्रेसने एकही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली नाही. ग्रामीणमधील काटोल आणि हिंगणा हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. अनेक वर्षांपासून शहरात किमान एक जागा द्यावी सातत्याने राष्ट्रवादीतर्फे केली जात आहे. आता शहरात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. सर्वच जागा रिकाम्या असल्याने नेत्यांनी ठरविल्यास शहरातील एखादा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याल येऊ शकतो.
इच्छुक उमेदवार
दक्षिण पश्‍चिम ः महादेवराव फुके, दिलीप पनकुले, दक्षिण : ईश्वर बाळबुधे, डॉ. योगेश कुंभलकर, श्रीकांत शिवणकर, अशोक काटले, राजकुमार नागुलवार
पूर्व नागपूर : दुनेश्वर पेठे, जानबा मस्के, मध्य नागपूर ः अनिल अहीरकर, नूतन रेवतकर, प्यारुद्दीन उल्फुद्दीन
पश्‍चिम नागपूर : प्रकाश गजभिये, शैलेंद्र तिवारी, गंगाप्रसाद ग्वालवंशी, बाबाराव गावंडे, उत्तर नागपूर ः वर्षा श्‍यामकुळे, महेंद्र भांगे, विशाल खांडेकर यांचा समावेश आहे. याशिवाय इच्छुक उमेदवाराच्या यादीत धनंजय देशमुख, बजरंगसिंह परिहार, प्रकाश लिखाणकर, मिलिंद मानापुरे आदींचाही समावेश होता.
पक्षाच्या आदेशानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येतील. कॉंग्रेससोबत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेला जे मतदारसंघ येतील त्यानुसार उमेदवार ठरविल्या जातील.
अनिल देशमुख, माजी मंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55 interested in getting rid of city by NCP