पोलिओमुक्तीसाठी 550 मिलियन डोसेसची तयारी

चेतन देशमुख
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : जगातील 45 देशांत हाफकिन पोलिओ औषधांचा पुरवठा करते. यंदा पोलिओमुक्तीसाठी 550 मिलियन डोसेस हाफकीन तयार करणार आहे. जगातील पोलिओ निर्मूलन तसेच पोलिओ संशोधनावर "डब्यूएचओ'तर्फे जिनेव्हा येथे सोमवार (ता. 14) व मंगळवार (ता. 15)ला दोनदिवसीय परिषद होणार असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख प्रतिनिधित्व करणार आहेत.

यवतमाळ : जगातील 45 देशांत हाफकिन पोलिओ औषधांचा पुरवठा करते. यंदा पोलिओमुक्तीसाठी 550 मिलियन डोसेस हाफकीन तयार करणार आहे. जगातील पोलिओ निर्मूलन तसेच पोलिओ संशोधनावर "डब्यूएचओ'तर्फे जिनेव्हा येथे सोमवार (ता. 14) व मंगळवार (ता. 15)ला दोनदिवसीय परिषद होणार असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख प्रतिनिधित्व करणार आहेत.
हाफकिन महामंडळ हे देशातील प्रतिविष, रक्तजल अणि सर्पदंश प्रतिरोधक औषधे उत्पादन करणारी अग्रगण्य संस्था आहे. काही महिन्यांपूर्वी पश्‍चिम आशियातील "येमेन' या देशातून हाफकिनकडे जीवरक्षक औषधांची मागणी प्राप्त झाली आहे. यासाठी औषध निर्माण करण्याचे काम सुरू झाले. भारतातील सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या या महामंडळास जागतिक आरोग्य संघटनेचे मानांकन प्राप्त आहे. गेली चार दशके देशातील सार्वत्रिक लसीकरण मोहिमेसाठी हाफकिनकडून पोलिओची निर्मिती केली जात आहे. युनिसेफने 2019-20 या वर्षांसाठी 550 मिलियन डोसेस पुरठ्याचे आदेश दिले आहेत. यातील 14 कोटी डोसेस हे मोझाम्बिक या देशात निर्यात केले जाणार आहे. भारताला पोलिओमुक्त करण्यात महामंडळाचे मोठे योगदान आहे. युनिसेफमार्फत महामंडळ आशिया, आफ्रिका तसेच लॅटिन अमेरिका या खंडातील अनेक देशांमध्ये पोलिओ लसीचा पुरवठा करीत आहे. पोलिओ लसी पुरवठ्याच्या माध्यमातून महामंडळ आंतरराष्ट्रीयस्तरावर पोलिओ निर्मूलनामध्ये मोठे योगदान देत आहे. यासाठी 14 व 15 ऑक्‍टोबरला जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय असलेल्या जिनेव्हा येथे कार्यशाळा होत आहे. पोलिओ निर्मूलनाबाबत जगातील स्थिती, औषधांची मागणी तसेच पोलिओ औषधी संशोधन या विषयांवर चर्चा होणार आहे. यासाठी हाफकिनला विशेष निमंत्रण मिळाले आहे. या परिषदेत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख प्रतिनिधित्व करणार असल्याने ते राज्याला फायदेशीर ठरणार आहे.
"जिनेव्हा' येथे होणाऱ्या परिषदेत पोलिओ लसीच्या उत्पादनाच्या नियोजनासोबतच पोलिओ लसीकरणामधील नवीन संशोधन याबाबत चर्चा होणार आहे. येणाऱ्या काळात ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख,
व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 550 million doses ready for polio release