चोरीला गेले ८८ हजार, एक तक्रार केली अन् मिळाले ६० हजार

60 thousand rupees got back with help of cyber crime in amravati
60 thousand rupees got back with help of cyber crime in amravati

अमरावती : मेहनतीने कमविलेले पैसे सायबर गुन्हेगारांच्या घशात घातल्यानंतर आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास करताना, गेलेल्या रकमेपैकी 60 हजारांची रोकड वाचविण्यात यश आले. ही रक्कम त्या युवकाच्या खात्यात जमा झाली.

राहुल सुरेश मेश्राम (वय 20, रा. यशोदानगर) हा शहरातील एका मोठ्या व्यापारी संकुलामध्ये किरकोळ कामे करतो. त्यानंतर सायंकाळी खासगी एजंसीद्वारे ग्राहकांना घर, कार्यालयापर्यंत खाद्य पदार्थ पोहोचविण्याचे देखील काम करतो. त्यातून मिळालेली रक्कम राहुल याने बँक खात्यामध्ये जमा केली होती. नोकरीसाठी काही साइटवर आपली माहिती त्याने अपलोड केली होती. त्याच दरम्यान त्याला अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने राहुलने पाठविला बायोडाटा वाचल्याचे सांगून त्याच्यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया गोवा शाखा येथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तीने सुरेश यास दाखविले. त्यानंतर विविध कारणे सांगून 19 जून 2020 ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत विविध टप्प्यात त्या व्यक्तीने राहुल यास 88 हजार 270 रुपये दिलेल्या बँकखात्यामध्ये ऑनलाइन भरण्यास सांगितले.

रक्कम भरल्यानंतर नोकरी लागत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. अनोळखी व्यक्तीने नोकरीच्या नावाने आपल्याकडून पैसे हडपल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्याने सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये गेलेल्या रकमेपैकी 60 हजार रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले. ती रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर राहुल मेश्राम यांनी सायबर पोलिसांचे आभार मानले. 

अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधताना, आर्थिक व्यवहार करताना, शहानिशा करायला हवी. कुणालाही ओटीपी किंवा बँक डिटेल्स शेअर करू नये. 
-रवींद्र सहारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com