

यवतमाळ : जिल्ह्यात टंचाई हळूहळू डोके वर काढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल 589 गावे टंचाईच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. यंदाही पाचशेंच्यावर खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्यातरी टंचाईने डोके वर काढलेले नाही. जलपातळी बऱ्यापैकी असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. नागरिकांना टंचाईचा फटका बसू नये, यासाठी उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात उपाययोजना सुरू झालेल्या नाहीत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने टंचाई निवारणार्थ कारवाईला वेग दिला आहे. पाणीटंचाई संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील यंत्रणा कामाला लागली आहे. पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा 104 प्रकल्पातील जलसाठ्याचा आढावा घेतला. त्यामुळे सध्या जरी जिल्ह्यात टंचाईची स्थिती नसली तरी भविष्यात काही भागात टंचाई सदृश्यस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ सात कोटी 80 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रकल्पात जलसाठा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे फारशी टंचाई उद्भवण्याची शक्यता नाही.
| प्रकार | गावे | उपाययोजना संख्या |
| तात्पुरती पूरक नळ योजना | 13 | 13 |
| नळ योजना विशेष दुरुस्ती | 35 | 35 |
| खासगी विहीर अधिग्रहण | 514 | 561 |
| विहीर खोलीकरण | 06 | 06 |
21 टॅंकरचे नियोजन -
गेल्यावर्षी टंचाईने जिल्ह्यातील नागरिक बेजार झाले होते. मात्र, स्थिती नियंत्रणात होती. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत स्थिती बरी आहे. असे असले तरी वाढते तापमान पाहता टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज असून 21 टॅंकर प्रस्तावित करण्यात आले असून 21 गावांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.