मंत्री, आमदारांसाठी ६३ लाखांचे टीव्ही

राजेश चरपे
रविवार, 1 जुलै 2018

नागपूर - अधिवेशनकाळात दरवर्षी रविभवन, आमदार निवास तसेच विधानभवनातील मंत्र्यांच्या केबिनमध्ये भाडेतत्त्वावर टीव्ही लावले जातात. त्यावर केबल कनेक्‍शनसह सुमारे पाऊण कोटीचा खर्च केला जातो. यावरील एकूण खर्च आणि टीव्हीची संख्या लक्षात घेता पंधरा ते वीस दिवसांसाठी एका टीव्हीसाठी सरासरी साडेनऊ हाजार रुपये भाडे दरवर्षी मोजले जात आहे.

नागपूर - अधिवेशनकाळात दरवर्षी रविभवन, आमदार निवास तसेच विधानभवनातील मंत्र्यांच्या केबिनमध्ये भाडेतत्त्वावर टीव्ही लावले जातात. त्यावर केबल कनेक्‍शनसह सुमारे पाऊण कोटीचा खर्च केला जातो. यावरील एकूण खर्च आणि टीव्हीची संख्या लक्षात घेता पंधरा ते वीस दिवसांसाठी एका टीव्हीसाठी सरासरी साडेनऊ हाजार रुपये भाडे दरवर्षी मोजले जात आहे.

हिवाळी अधिवेशनात २१ इंचीचे ३९० टीव्ही आणि ३२ इंचीचे २४८ एलएडी टीव्ही २१ दिवसांसाठी भाड्याने घेण्यात आले होते. त्याकरिता ६३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आला. आता पावसाळी अधिवेशनासाठी पुन्हा टीव्ही भाड्याने घेण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या खर्चात ब्रॅंडेड कंपनीचे दर्जेदार टीव्ही नेहमीसाठी रविभवन, आमदार निवास व मंत्र्यांच्या खोल्यांमध्ये लावले जाऊ शकतात. मात्र खर्चिक सार्वजनिक बांधकाम विभाग हे मान्यच करीत नाही. कदाचित दरवर्षी खर्च करता येणार नसल्याने टीव्ही खरेदी केले जात नसावेत. कंत्राटदाराची घसघशीत कमाई
अधिवेशनासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचे साहित्य दरवर्षी भाड्याने घेतले जातात. यात ब्लॅंकेट, गाद्या, ताट, वाट्यांपासून तर पाण्याचे ड्रम आणि पलंगांचा समावेश असतो.

मागील वर्षी २२ हजार गाद्या, तेवढ्याच उशा आणि ब्लॅंकेट घेण्यात आले होते. याशिवाय १० हजार वाट्या, तीन हजार ताट, पाच हजार प्लेट, ॲल्युमिनियमचे हजार गंज, दोनशे हायप्रेशर गॅस शेगड्या, दोनशे लो प्रेशर गॅस शेगड्या, दोनशे फोल्डिंग पलंग, दोनशे तवे, दोनशे प्लॅस्टिकचे ड्रम आदींचा समावेश आहे. साहित्याचा पुरवठा अनेक वर्षांपासून एकच कंत्राटदार करतो. एवढे सुटे साहित्य खरेदी करून वर्षभर ठेवणे व देखभाल करणे शक्‍य नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. हे जरी खरे असले तरी कंत्राटदाराची मात्र घसघशीत कमाई होत आहे.

कंत्राटी लिफ्टमॅनवर ५ लाखांचा खर्च
अधिवेशन काळात कंत्राटी पद्धतीने लिफ्टमॅन नेमले जातात. आमदार निवासातील विंग एक व विंग दोनमध्ये अशा एकूण चार लिफ्ट आहेत. आठ तासांच्या एक शिफ्टनुसार कर्मचारी नेमल्यास एकूण १२ जणांची आवश्‍यकता असते. किमान वेतनानुसार प्रत्येकाला १० हजार रुपयांचा मोबदला दिल्यास एक लाख २० हजार रुपये खर्च होतात. मात्र लिफ्टमॅनवर मागील वर्षी पाच लाख रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदाराने यातून २१ दिवसांत तब्बल साडेतीन लाख रुपये कमावले आहेत. 

Web Title: 63 lakh ruppes TV for minister and mla PWD