दारूबंदीला गडचिरोलीतील  698 गावांचे समर्थन, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवला प्रस्ताव

खुशाल ठाकरे  
Thursday, 29 October 2020

गावात छुप्या मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती ग्रामपंचायत  व मुक्तिपथच्या तालुका चमूला मिळताच संयुक्तरीत्या दुकानांची तपासणी केली. दोन दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

गडचिरोली : जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दारूबंदीला धक्का लागू नये, यासाठी आतापर्यंत जिल्हाभरातील 698 गावांनी पुढाकार घेत दारूबंदीचा ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठविला आहे. जिल्ह्यातील दारूबंदी टिकवा, अशी एकमुखी मागणी सिरोंचा तालुक्‍यातीलच 92 गावांनी केली आहे.

सिरोंचा तालुक्‍यातील बेजुरपल्ली, पर्सेवाडा,  झेंडा,  दर्शेवाडा, येलामाल,  पीरमेडा, सोमनपली माल, बालमुत्युंपल्ली, अंकिसा चक,  नगरम, मरीगुडम, रंगयापल्ली, मेडाराम चक, कोट्टामाल, मदीकुंठा, रामकृष्णपूर, राईगुडम, पत्तागुडम, पेनलाया, बोन्डरा, बोगतागुड्डम, चिकेला, मोयाबीनपेठा, कोटापल्ली, विठ्ठलरावपेठा, नरसयापल्ली, चिंतरेवला, कोटापल्ली माल, पोचमपल्ली, झिंगानूर माल, झिंगानूर नंबर 1, झिंगानूर नंबर 2,  नळीकुडा, गर्कापेठा म., रामेशगुडम ,किष्टयापल्ली, कर्जेली, कोर्ला माल, सिरकोंडा माल, आयपेठा, राजन्नापल्ली, आरडा, 

अधिक माहितीसाठी - एक लक्षात ठेवा! राष्ट्रवादी आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष; शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी दिला इशारा
 

लक्ष्मीदेवीपेठा चक, लक्ष्मीदेवीपेठा रे, रंगधामपेठा, मुत्तापूर माल, टेकडामोटला, सोनूर माल, मेडाराम माल, बामणी, येडसिली, अमरावती, ग्लासफोर्टपेठा, बोरमपल्ली माल, वडदेली, मंडलापूर, सुनकरली, तुमनूर माल, रामनजपूर टोला, गोलागुडम माल, रोमपल्ली, नंदीगाव चक, कंबलपेठा चक, चिटूर, जाफ्राबाद चक, मृदूक्रिष्णापूर, आदिमुत्तापूर, रामनजपूर वेस्ट लॅंड, नसिरखानपल्ली, अंकिसा माल, जानमपल्ली चक, पेंटीपाका, गोलागुडम चक, तुमनूर चक, तिगलगुडम, व्येंकटपूर, वेणलया माल, जानमपल्ली, जार्जपेठा, कोरला चक, कोपेला, वियमपल्ली, रायपेठ अली, राजेश्वरपल्ली चक, तमडाला माल, मेडाराम, गुमलकोंडा पॅच,  कंबालपेठा, गुमलकोंडा, रेगुंठा, रामनापेठा रे, ओडेगुडम या 92 गावांनी दारूबंदीला समर्थन दर्शवीत दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

दोन दुकानदारांवर कारवाई

कोरची तालुक्‍यातील कोटगुल येथे ग्राम प्रशासन व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या मोहीम राबवत गावातील दुकानांची तपासणी केली. दरम्यान, दोन दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पानठेले व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आदेश असताना अनेक जण नियमांचे उल्लंघन करत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहेत. गावात छुप्या मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती ग्रामपंचायत  व मुक्तिपथच्या तालुका चमूला मिळताच संयुक्तरीत्या दुकानांची तपासणी केली. दोन दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्या दुकानदारांकडून ग्रामपंचायतीने 700 रुपयांचा दंड वसूल केला.

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 698 villages in Gadchiroli district support alcohol ban