7 कोटींचा कर बुडविला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

अमरावती : एका व्यवसायाच्या नावाने नोंदणी करून तो न करता एकाच व्यक्तीच्या नावाने कोट्यवधींची आर्थिक उलाढाल केली. शासनाला खोटी विवरणपत्रे सादर करीत शासनाची दिशाभूल करून 7 कोटी 32 लाख 53 हजार 487 रुपयांचा कर बुडविल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले.

मंगेश गणेश सगने (वय 32 रा. मोर्शी) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी शनिवारी (ता. 21) कैलास पंजाब राऊत (रा. धाडी, जि.वर्धा), संजय साहू (जवाहरगेट, अमरावती), संजय प्रयाल ब्राह्मणे (रा. अमरावती), गोपाल निर्मळ (रा. तपोवन) या चौघांविरुद्ध शासनाच्या फसवणुकीसह मूल्यवर्धित कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. नमूद चारही व्यापाऱ्यांनी मोर्शी येथे कॉटन खरेदीचा व्यवसाय सुरू केल्याची नोंद आहे. 2010 ते 2016 असा, चौघाही व्यापाऱ्यांनी केलेल्या आर्थिक उलाढालीचा कालावधी आहे, असे पोलिस निरीक्षक श्री. सोळंके यांनी सांगितले. परंतु त्यानंतर हा व्यवसाय न करता, मोर्शी येथील एकाच व्यक्तीच्या नावाने कोट्यवधींची आर्थिक उलाढाल केली. परंतु मूल्यवर्धीत कायदा 2002 अंतर्गत शासनाला भरावयाचा सात कोटींच्या वर विक्रीकर अदा न करता बुडविला. त्यासाठी विक्रीकर विभागाकडे बनावट विवरणपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केली, असे प्राथमिक चौकशीतून पुढे आले.

कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यामुळे गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग केल्या जाईल.
- संजय सोळंके, पोलिस निरीक्षक, मोर्शी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 crore tax deducted