महावितरणचा खिसा रिकामाच, फक्त नागपूर विभागातील थकबाकी सात हजार कोटी

7 thousand crore rupees arrears of MSEB in nagpur division
7 thousand crore rupees arrears of MSEB in nagpur division

यवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना चार महिन्यांचे एकत्रित वीजबिले आली. त्यामुळे ग्राहकांकडून वीजबिले वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे नागपूर प्रादेशिक विभागाची थकबाकी सात हजार 354 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, या थकीत रक्कमेमुळे वीज महाविरण कंपनीचा खिशाच रिकामा झाला आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले. या काळात रीडिंग व बीलवाटप बंद होते. मार्चनंतर थेट जुलैमध्ये वीजबिले ग्राहकांना एकत्रित पाठविण्यात आलीत. बिलावरील रकमेचे आकडे पाहून ग्राहकांनी महावितरणकडे धाव घेतली. नागरिकांच्या तक्रारीचे ढीग महावितरणच्या कार्यालयात जमा झाले आहेत. विजेच्या वापरानुसार वीजबिले असल्याचे सांगून महावितरणकडून ग्राहकांना टप्प्याटप्प्यात बिले भरण्याची सवलत देण्यात आली. काही ग्राहकांनी विजबिले भरली, तर बहुतांश नागरिकांनी वीजबिल माफ होईल, या आशेने अजूनही विजबिले भरलेली नाहीत. लॉकडाउनच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे काहीजवळ वीजबिल भरण्यासाठी पैसे नाही. अशा दुहेरी पेचात ग्राहक अडकले आहेत. असे असले तरीदेखील थकबाकीमुळे आता महावितरणचा खिसा रिकामा होण्याची वेळ आली आहे.

एकट्या नागपूर प्रादेशिक विभागाची थकीत रक्कम सात हजार 354 कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे आता वीज महावितरण कंपनीसमोर संकटे उभे राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे सध्या तरी महावितरणकडून सक्तीची वसुली बंद आहे. मात्र, वाढती थकबाकी पाहता ती वेळ कधीही येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. त्यामुळे नागरिक आता थकीत रक्कम भरतात की, महावितरण वसुली मोहीम राबविणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

वर्गवारी ग्राहक थकीत रक्कम
घरगुती 12,89,779 850 कोटी
वाणिज्यिक 98,862 132 कोटी
औद्योगिक 13,561 48 कोटी
कृषी 579483 ४ हजार 918 कोटी
पथदीप 16,283 १ हजार 185 कोटी
पाणीपुरवठा 8,625 201 कोटी
सार्वजनिक सेवा 13,578 14 कोटी
ईत 991 अडीच कोटी

प्रादेशिक विभागातील ग्राहक -

20,21,162

एकूण थकीत रक्कम -

7,354 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com