esakal | पदवीधर निवडणुकीची जबाबदारी मिळाली, पण अनेक लोकप्रतिनिधी मतदानापासून वंचित; वाचा कोणाचे शिक्षण किती?
sakal

बोलून बातमी शोधा

no one political leader complete degree except two in chandrapur

आता याच लोकप्रतिनिधींवर पदवीधर मतदारसंघातील स्वपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी मतदानासाठी (नोंदणी केलेला) पात्र असतो. परंतु, प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या बहुतेकांकडे पदवी नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार, असे चित्र बघायला मिळत आहे. 

पदवीधर निवडणुकीची जबाबदारी मिळाली, पण अनेक लोकप्रतिनिधी मतदानापासून वंचित; वाचा कोणाचे शिक्षण किती?

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा समोरासमोर आले आहे. परंतु, उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारेच जिल्ह्यातील बहुतेक  विद्यमान आमदार, खासदार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाही. त्यांनी राजकरणामध्ये पद मिळवले. परंतु, शैक्षणिक पदवीअभावी  निवडणुकीत ते केवळ प्रचारप्रमुख आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात माजी अर्थमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडेच पद आणि पदवी आहे. या दोघांची मतदार म्हणून नोंदणी आहे. 

हेही वाचा - आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी तयार करतात सुंदर घरटं...

नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांचा नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात समावेश आहे. जवळपास दोन लाख दहा हजार पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी आहे. नागपूरनंतर सर्वाधिक सुमारे 38 हजार मतदार चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जयपराजयाचे गणित ठरविताना चंद्रपूरची भूमिका महत्त्वाची राहील. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने या जिल्ह्यातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले. चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची धुरा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आहे. परंतु, यातील केवळ धोटेच मतदानासाठी पात्र आहेत. 

हेही वाचा - मुलांमुळे आई-वडिलांना अनुभवता आला विवाह सोहळा; आयुष्याच्या सायंकाळी दाम्पत्य चढले...

निवडणूक आयोगाकडील शपथपत्रानुसार, जिल्ह्यातील बहुतांश आमदार पदवी प्राप्त नसल्याचे दिसून येते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार दहावा वर्ग उत्तीर्ण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वसंत विद्यालयातून वडेट्टीवार 1978-79 मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. खासदार धानोरकर यांनीसुद्धा बीए प्रथम वर्षानंतर शिक्षणाला जयमहाराष्ट्र केला. सोबतच त्यांनी औषधशास्त्र पदविकेची प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर बीए प्रथम वर्षाच्या पुढे जाऊ शकल्या नाही. चिमूरचे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी सन 2014 मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दहावी अनुत्तीर्ण असल्याचे सांगितले होते. 1997 मध्ये भांगडिया चिमूर येथील नेहरू विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी होते. परंतु, ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवास सुरू केला. त्यांनी वर्षभरापूर्वीच वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली. सन 2019 मधील शपथपत्रात ते वाणिज्य शाखेचे प्रथम वर्षाची परीक्षा दिल्याचा उल्लेख आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवारसुद्धा दहावीच्या पुढे जाऊ शकले नाही. ते उत्तीर्ण झाले. परंतु, पुढच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला नाही. आता याच लोकप्रतिनिधींवर पदवीधर मतदारसंघातील स्वपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी मतदानासाठी (नोंदणी केलेला) पात्र असतो. परंतु, प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या बहुतेकांकडे पदवी नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार, असे चित्र बघायला मिळत आहे. 

हेही वाचा - काय सांगता! हिवाळ्यात विदर्भावर पावसाचे सावट; प्रादेशिक हवामान विभागाने दिले तसे संकेत

मुनगंटीवार, धोटे मतदार - 
भाजपचे आमदार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आजच्या घडीला जिल्ह्यातील  सर्वाधिक शिक्षित लोकप्रतिनिधी आहेत. मुनगंटीवार यांच्याकडे अनेक पदव्या आहेत. त्यांनी बी-कॉम, एम-कॉम, डीबीएम, कायद्याची पदवी, पत्रकारितेच्या पदवीसोबतच  एम-फिल पूर्ण केले आहे. काँग्रेसचे राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे कला शाखेतील पदवीधर आहेत. या दोघांनीही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि भाजपचे लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी जिवाचे रान करतील. परंतु, मतदान मात्र हे दोघेच देऊ शकतील. 

हेही वाचा - अखेर राणा दाम्पत्याची रात्री सुटका, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नव्याने मोर्चेबांधणी

जोशी बीकॉम, वंजारी एलएलबी -
भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी, तर महाविकास आघाडीने अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरविले. जोशी बी-कॉम, तर वंजारी यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. वऱ्हाडी भाषेत शिकविणारे 'यू-ट्यूब'स्टार नीलेश कराळे यांचीही उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे. खराळे बीएस्सी, बीएड आहेत. 

संपादन - भाग्यश्री राऊत