esakal | अमरावती महापालिकेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ७० कर्मचारी पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

70 employees of amravati municipal corporation found corona positive}

जानेवारी महिन्यात कोरोना संक्रमणाची गती कमी होती, ती फेब्रुवारीत मोठ्या संख्येने वाढली. महानगरातील संक्रमणावर नियंत्रणासाठी तैनात महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार डॉक्टरसह चाचणी केंद्रातील कर्मचारी, झोन अधिकारी असे तब्बल 70 जण कोरोना संक्रमित झाले आहेत.

अमरावती महापालिकेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ७० कर्मचारी पॉझिटिव्ह
sakal_logo
By
राजू तंतरपाळे

अमरावती : शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेबरोबर आता महापालिकेतही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथील ७० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - जंगलात जनावरे चराईसाठी गेला आणि समोरचे दृष्य पाहून सरकली पायाखालची जमीन

जानेवारी महिन्यात कोरोना संक्रमणाची गती कमी होती, ती फेब्रुवारीत मोठ्या संख्येने वाढली. महानगरातील संक्रमणावर नियंत्रणासाठी तैनात महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार डॉक्टरसह चाचणी केंद्रातील कर्मचारी, झोन अधिकारी असे तब्बल 70 जण कोरोना संक्रमित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गृहविलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संक्रमित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेच्या कामकाजावर विपरीत परिणाम पडू लागला आहे.

हेही वाचा - Sad Story : मुलांनी हाकलले, परक्यांनी स्वीकारले; ७५ वर्षांच्या गुरनुलेंवर भीक...

दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. एकूण तीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. या चाचण्यांचे अहवाल मात्र धक्कादायक ठरलेत. तीनशे पैकी तब्बल ५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही भरीस भर म्हणजे १३ कर्मचाऱ्यांचे अख्खे कुटुंबच पॉझिटिव्ह आढळून आले आहे. विद्यापीठातील बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या बघता विद्यापीठातील दैनंदिन कामकाजावर विशेषतः परीक्षांच्या कामांवर विपरीत परिणाम पडणार असल्याचे परीक्षा व मूलमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.