तोतयाकडून बॅंक खातेदाराची 74 हजाराने फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अमरावती : तोतयाने बॅंक खातेदारासोबत संपर्क साधून हा कस्टमर केअरचा मोबाईल नंबर असल्याचे सांगितले. त्यानंतर काही माहिती शेअर करण्यास भाग पाडून, तोतयाने खात्यातील 74 हजार 399 रुपये दुसऱ्या खात्यात वळवून फसवणूक केली. अभयसिंग धरमसिंग ठाकूर (रा. बेरी, मधुरा, उत्तरप्रदेश) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

अभयसिंग ठाकूर मूळचे वरुड येथील रहिवासी आहेत. ग्रामीण सायबर पोलिसांनी ठाकूर यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ठाकूर हे गुगल-पे वरून वडिलांच्या बॅंक खात्यात 30 हजार रुपये ट्रान्स्फर करीत होते. परंतु पैसे पाठविले जात नसल्यामुळे त्यांनी कस्टमर केअरला फोन केला. एका मोबाईलधारकाने हा कस्टमर केअरचा नंबर असल्याचे भासवून ठाकूर यांना एक एसएमएस पाठविला. पाठविलेला एसएमएस दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यास तोतयाने सल्ला दिला. ही प्रक्रिया ठाकूर यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यामधून 74 हजारांची रोख रक्कम तोतयाने दुसऱ्याच्या बॅंकखात्यात वळती करून फसवणूक केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 74,000 fraudulently defrauded bank account holder