esakal | गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत 755 गावांचा दारूबंदीच्या समर्थनात ठराव; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

755 villages in gadchiroli district are in favor of darubandi

जिल्ह्यातील दारूबंदी फायदेशीर ठरली असून दारूबंदी न उठवता कायम ठेवावी, अशी मागणी या गावांनी त्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत 755 गावांचा दारूबंदीच्या समर्थनात ठराव; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र 

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, जिल्हाभरातील 755 गावांना दारूबंदी कायम हवी आहे. एकट्या धानोरा तालुक्‍यातीलच 74 गावांनी दारूबंदी टिकविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. जिल्ह्यातील दारूबंदी फायदेशीर ठरली असून दारूबंदी न उठवता कायम ठेवावी, अशी मागणी या गावांनी त्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

धानोरा तालुक्‍यातील झरी, दूधमाळा, मुरूमगाव, कांदळी, खरकाडी, चवेला, तुकूम, मालंडा, गट्टानयेली, कन्हाळटोला, मर्कागाव, तोडेमसाहत, दारची, चुडीयाल, धवरी, वाडगाव, पवणी, सावंगा बू, खुटगाव, पळसगाव, होरेकसा, ढोरगट्टा, कोंडेकल, काकडयेली, पळसवाडी, चिमरीकल, बोदिरी, कामनगड, गिरोला, उदेगाव, चातगाव, सोमलपुर, हडापेठ, मेंढाटोला, मुंगनेर, सिंगापूर, मेंढा, परसवाडी, गोडलवाही, हातांजुर हे गाव आहेत. 

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

तसेच यडसागोंदी, कोंदावाही, डब्बा, वाघभूमी, तळेगाव चक, मुजळगोंदी, केरमरहान, सिंसुर, बातमरहान, कवाडीकसा, पालखेडा, कारेमरका, गट्टेपायली, तळोधी, मोहली, चिंगली, गुजनवाडी, देऊळगाव, मिचगाव खू, मिचगाव बू, पुसावंडी, भुसमकुडो, निमनवाडा, बोरी, मोडेभट्टी, जांगदा बू, कन्हाळगाव, अस्वलपार, काचाकल, तुलमर, चिचोडा, मकेपायली, पाथरगोटा, कुपानर या 74 गावांना जिल्ह्यातील दारूबंदी कायम हवी आहे. या गावांनी दारूबंदीसाठी ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना तसे पत्र पाठविले आहे.

चन्नाबोडीचाही सहभाग

जिल्ह्यातील दारूबंदी न उठविता अधिक मजबूत करावी. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी एटापल्ली तालुक्‍यातील चन्नाबोडी ग्रामसभेने केली आहे. या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी लागू झाली. 

क्लिक करा - ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता 

शासकीय दारूबंदीनंतर शेकडो गावांनी पुढाकार घेत गावात दारूबंदी केली. लोक संघटित व सक्रिय होऊन दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दारूचा वापरसुद्धा कमी झाला आहे. दारूबंदीमुळे स्त्रियांचा व जनतेचा प्रचंड फायदा झाला आहे. जिल्ह्याच्या दारूबंदीला आमचे समर्थन आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीत दारूबंदी उठवू नये, उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी प्रबळ कृती करावी, अशी मागणी चन्नाबोडी ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top