विद्यापीठांच्या 80 टक्के प्राध्यापक भरतीला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नागपूर : राज्यातील 12 अकृषी विद्यापीठांसह तीन अभिमत विद्यापीठांना 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यानुसार रिक्त असलेल्या 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविता येणार आहे. तसा अधिकृत अध्यादेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला आहे. प्राध्यापकांच्या भरतीत जवळपास सहाय्यक प्राध्यापकांना प्राध्यानक्रम देण्याची सूचनाही सरकारकडून करण्यात आलेली आहे. अकृषी विद्यापीठात प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या बरीच मोठी आहे.

नागपूर : राज्यातील 12 अकृषी विद्यापीठांसह तीन अभिमत विद्यापीठांना 80 टक्के प्राध्यापक पदांची भरती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यानुसार रिक्त असलेल्या 1 हजार 166 पदांपैकी 659 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविता येणार आहे. तसा अधिकृत अध्यादेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढला आहे. प्राध्यापकांच्या भरतीत जवळपास सहाय्यक प्राध्यापकांना प्राध्यानक्रम देण्याची सूचनाही सरकारकडून करण्यात आलेली आहे. अकृषी विद्यापीठात प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या बरीच मोठी आहे. दिवसेंदिवस विद्यापीठातून प्राध्यापकांची संख्या कमी होत असल्याने बऱ्याच विभागांमध्ये कंत्राटी आणि तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करून काम भागविल्या जात होते. विशेष म्हणजे नॅक मूल्यांकनात रिक्त पदांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यापीठांचे मानांकन घसरण्याची चिन्हे दिसून लागली होती. यातूनच बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 12 अकृषी विद्यापीठे आणि तीन अभिमत विद्यापीठांमधील एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के प्राध्यापकांची भरती करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांमध्ये 659 प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यामध्ये मुंबई विद्यापीठात सर्वाधिक 134 पदे, पुणे विद्यापीठात 111 तर नागपूर विद्यापीठाला 92 प्राध्यापकांची पदे भरण्याची परवानगी मिळणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांमधील 80 टक्के प्राध्यापकांच्या पदभरतीला मंजुरी दिली. मात्र, यासंदर्भात प्रत्यक्ष प्रक्रिया विधानसभा निवडणुकांच्यानंतरच होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील बहुतांश विद्यापीठांमधील बिंदुनामावली (रोस्टर) तयार झाले नसल्याने ते तयार होतपर्यंत दीड ते दोन महिन्यांचा कालावधी निघून जाणार आहे. त्यामुळे निवडणुकानंतरच या पदांवर भरती होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 percent of universities Approval of Professor Recruitment