esakal | नागपूर विभागात तब्बल ८९९ शाळाबाह्य मुले, शिक्षणविभागासमोर आव्हान

बोलून बातमी शोधा

file photo

नागपूर विभागात तब्बल ८९९ शाळाबाह्य मुले, शिक्षणविभागासमोर आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदोरी (जि. वर्धा) : राज्यातील शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष सर्वेक्षणाची शोध मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत राज्यात तब्बल २५ हजार २०४ शाळाबाह्य बालके आढळून आली; तर नागपूर विभागात ८९९ शाळाबाह्य बालके आढळली. आता या बालकांना कोरोनानंतरच्या काळात शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे आव्हान शिक्षणविभागासमोर आहे.

हेही वाचा: बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

कोरोनामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्य शासन बालकांच्या नियमित शिक्षणासाठी आणि बालके शाळाबाह्य होऊ नयेत, यासाठी प्रयत्नशील आहे. तरीही यामध्ये खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रामुख्याने मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. रोजगाराची अनिश्‍चितता, सामाजिक असुरक्षितता आणि पालकांच्या मनातील भीती यामुळे वाढणारी बालमजुरी आणि बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचे आव्हान समोर उभे आहे. विशेषतः या परिस्थितीत दिव्यांग मुलाबाबतची आव्हाने अधिक वाढत आहेत. शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्यात १ ते १० मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात औरंगाबाद, अमरावती, बुलडाणा, पिंपरी-चिंचवड, नागपूरला ही मोहीम सुरू करण्यात आली नव्हती.

जिल्हानिहाय शाळाबाह्य बालकांची संख्या

  • गडचिरोली २७७

  • नागपूर २३१

  • वर्धा १७७

  • चंद्रपूर १०७

  • गोंदिया ८८

  • भंडारा १९

  • एकूण ८८९