esakal | बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख

बोलून बातमी शोधा

baby
बाळांना कोरोनाचा धोका असतो का? वाचा काय सांगतात डॉ. देशमुख
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाळंतीण, गर्भवती महिला, बालकांनाही कोरोनाची भीती सतावतेय. बाळाला काही होणार तर नाही, या शंकेने पालकांच्या मनात घर केले आहे. मात्र, प्रसिद्ध स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख यांनी काळजी न करण्याचा सल्ला दिला. विशेष काळजी घेतल्यास बाळाला कोरोना होत नाही, असे सांगून त्यांनी कोरोनाला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी जिद्दीने लढण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांना 'सळो की पळो' करून सोडले. बाळंतीण आणि गर्भवती महिलांनाही चिंता सतावतेय. त्यांच्याही मनात एक अनामिक भीती निर्माण होते. आपल्या बाळाला तर धोका नाही, असे त्यांना नेहमी वाटते. मात्र, काळजी न करण्याचा सल्ला स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ. सुषमा देतात. दूधपित्या बाळाला आईपासून कोरोना होण्याची धोका नाही. मात्र, त्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. देशमुख या गेल्या २५ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

महत्वाच्या काही गोष्टी -

  • नुकत्याच जन्मलेल्या बाळांमध्ये प्रादुर्भाव खूप जास्त दिसून येत नाही.

  • आईकडून हा आजार बाळाला सक्रंमित होऊ शकतो.

  • आईकडून बाळाला नाळेतून संक्रमित होत नाही.

  • आईच्या दुधातून बाळाला संक्रमण होत नाही.

  • गर्भवती स्त्रियांनी फक्त १२, १९ आणि ३२ आठवड्यांचीच फेरतपासणी ठेवावी.

  • कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, सॅलड यांचा आहारात मुबलक वापर करावा.

  • गर्भवतीने स्त्रीरोगतज्ञांच्या संमतीने व्यायाम करावे.