There is no bird flu in Nagpur district yet
There is no bird flu in Nagpur district yet

खवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा सल्ला वाचाच

नागपूर : कोरोनाच्या पाठोपाठ आता पक्षांना होणाऱ्या बर्ड फ्लूच्या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सहा राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असताना नागपूर जिल्ह्यात अद्याप त्याची लागण झालेली नाही. पशुवैद्यक तज्ज्ञांनी भारतीय चिकन तयार करण्याच्या पद्धतीमुळे त्यात बर्ड फ्लूचे विषाणू जिवंत राहत नसल्याने खवय्यांनो बिनधास्त चिकन खा असा सल्ला दिला आहे.

हरियाना, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजराथ, केरळ व मध्य प्रदेशात बर्ड फ्लूच्या विषाणूने थैमान घातले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव यांनी व्हीसीच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता प्रशासनही सज्ज झाले आहे.

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी युवराज केने यांनी सांगितले, जिल्‍ह्यात बर्ड फ्लूची अद्याप लागण झालेली नाही. प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. पक्ष्यांचे रॅंडमली नमुने घेण्यात येते. भोपाळ आणि पुणे येथे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येते. जिल्ह्यात ७९ संस्था आहेत. सर्व डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचे लक्षण आढळल्यास विल्हेवाट लावण्यात येईल. आवश्यक पीपीई किट आहेत. त्यामुळे सध्यातरी घाबरण्याचे कारण नाही.

पक्षांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात येतात पालनकर्त्यांनी याची माहिती तात्काळ विभागाला द्यावी, असे आवाहन केने यांनी केले. ज्या राज्यात बर्ड फ्लूच्या केसेस आढळल्या तेथेही अफवा पसरली आहेत. २००३ नंतर २००६ साली महाराष्ट्रातच बर्ड फ्लूने संक्रमित पक्षी आढळले होते.

महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. आता मध्यप्रदेशापर्यंत हा विषाणू आढळून आला आहे. बर्ड फ्लूच्या संक्रमण काळात भारतात मृत्यूची अद्याप नोंद मात्र सापडत नाही, असेही केने म्हणाले.

‘बर्ड फ्लू’ची लक्षणे

  • श्वासोच्छवासामध्ये अडथळे येणे 
  • खोकल्याची समस्या 
  • कफ, पोटदुखी 
  • डोकेदुखी, मळमळणे 
  • तापासह शरीर आखडणे 
  • शारीरिक वेदना, पित्त होणे 
  • थोडेसे काम केल्यानंतर थकवा जाणवणे 

​ही खबरदारी घ्या

  • घरामध्ये पक्षी पाळू नका
  • पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळा
  • संसर्गापासून बचावासाठी वारंवार हात स्वच्छ धुवा

शेतकरी देशोधडीला, व्यापाऱ्यांची चांदी

बर्ड फ्लू आल्याच्या भीतीने चिकन व्यावसायिक कुक्कुटपालकांना मागणी नसल्याचे कारण पुढे करून बार्गिनिंग करतात. कोंबड्याचे भाव कमी झाल्याने कुक्कुटपालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. भीतीत घसरलेल्या दरात कोंबड्याची विक्री करीत असल्याने त्यांचे आर्थिक गणीत बिघडते. त्यामुळे बर्ड फ्लूमुळे नव्हे तर कोंबड्यांची विक्री न होणे आणि कर्जाचा बोजा वाढल्याने कुक्कुटपालकांचे जीव जातात हे मात्र, तेवढेच खरे आहे, असे एका पोल्ट्री व्यावसायिकाने सांगितले. 

भारतात प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी
बर्ड फ्लूचा प्रसार आजारी पक्ष्यांमुळे होतो. या विषाणूचा ७० अंश सेल्सिअसवर नाश होतो. भारतात १०० अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच्या तापमानात चिकन शिजविण्यात येत असल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. 
- डॉ. विनोद धूत,
प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय 

बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले नाही
भोपाळ येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविलेल्या कोंबडी आणि अंड्याच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कावळा आणि इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली असल्याचाही अहवाल त्यांनी दिलेला आहे. अंडे हे कोरोनाच्या काळात सर्वाधिक प्रोटिन्स देणारे खाद्य ठरले आहे.
- सोहेल बशीर खान,
संचालक, सुविधा एग्ज

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com