99 th Natya Sammelan from Friday
99 th Natya Sammelan from Friday

99 वे नाट्य संमेलन शुक्रवारपासून; प्रा. एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 99 व्या नाट्य संमेलनाला शुक्रवारपासून (ता. 22) नागपुरात प्रारंभ होत आहे. रेशीमबाग मैदानावरील कै. पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंचावर ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.

मुख्य रंगमंचावर सायंकाळी 6.30 वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहतील. तर नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, विद्यमान अध्यक्ष कीर्ती शिलेदार,केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक मंत्री तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन गडकरी आणि महापौर नंदा जिचकार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असेल. उद्घाटन सोहळ्यापूर्वी दुपारी 3 वाजता महालमधील शिवाजी पुतळा येथून नाट्यदिंडी निघेल.

चिटणीस पार्क स्टेडियम, बडकस चौकमार्गे ही दिंडी संमेलनस्थळी पोहोचेल. कलशधारी 99 महिला दिंडीचे नेतृत्व करणार आहेत. शिवशाही ढोलपथकासह नागपुरातील जुन्या दिग्गज कलावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री 10 वाजता कवीवर्य सुरेश भट सभागृहात 'पुन्हा सही रे सही' या गाजलेल्या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होईल. तर पहाटे एक वाजता झाडीपट्टी रंगभूमीवरील 'आक्रोश' या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com