'केबीसी' मध्ये झळकणार आमटे दाम्पत्य; 7 सप्टेंबरला प्रक्षेपण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

गडचिरोली : छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो मध्ये महानायक अमिताभ बच्चन हे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या सहचारिणी डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यातील एकेक पैलू उलगडणार आहेत. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या दहाव्या पर्वाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आतापर्यंत केबीसीमध्ये बॉलिवूड, क्रीडा व अन्य क्षेत्रांतील व्यक्तींना बोलावण्यात आले होते. परंतु दहाव्या पर्वात समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार आहेत. खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

''डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे या दोन असामान्य व्यक्तींचा सहवास लाभणं ही माझ्यासाठी आनंद व सन्मानाची बाब आहे. कुणीही विचार करु शकत नाही, असं त्यांचं जीवन आणि आदिवासींसाठी केलेलं काम अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असं काम ते करताहेत. केबीसीच्या 'कर्मवीर' भागाच्या निमित्तानं ते माझ्यासोबत होते'', असa अमिताभनं ट्विटरवर म्हटलं आहे. येत्या 7 सप्टेंबरला या भागाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.

Web Title: aamte couple participated in KBC episode on 7 September