अखेर हारवलेला चैतन्य नागपुरमध्ये सापडला 

ऱाजेश सोळंकी
शनिवार, 24 मार्च 2018

आर्वी - तालुक्यातील रोहणा येथील चैतन्य गजानन गंध्रे (16) याने सोरटा मॉडेल हायस्कूल या दहावीच्या परिक्षाकेंद्रावर १६ मार्चला पेपर दिला. त्यानंतर रोहणा बस स्थानकावर चैतन्य आपल्या आजीचे गावाला जातो असे सांगून बसने पुलगाव कडे निघाला होता. मात्र तो आजीच्या गावाला पोहचलाच नाही. त्यामुळे त्याचे वडील गजानन गंध्रे रा.बोरगांव (हातला) यांनी पुलगाव पोलिस ठाण्यामध्ये चैतन्यची हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांना चैतन्य नागपूरमध्ये सापडला. त्याला नागपूर व पुलगाव पोलिसांनी बोरगाव येथे कुटूंबियाच्या स्वाधीन केले.

या संदर्भात डिजिटल ई सकाळने बातमी प्रसिद्ध केली होती चैतन्यचे भावाने तालुका बातमीदाराला फोन करुन चैतन्य सापडलयाची माहिती देउन सकाळचे आभार मानले..

पुलगाव पोलिस ठाण्यातील मुरलीधर बुराडे यांच्या मार्गदर्शनाखली रोहणा पोलिस चौकीचै जमादार अशोक भोयर, अनिल भोवरे व कर्मचारी यांचे पथक नेमुन पोलिसांनी चैतन्यचा शोध सुरु केला. त्याचा शोध सुरु असतांना २१ मार्च रोजी दुपारी पोलिस जमादार अशोक भोयर यांना एक फेन आला की एक मुलगा नागपुर रेल्वे स्टेशन जवळ आहे. त्या फोनवर परत संपर्क करुन मुलाबाबत आवश्यक माहीती घेऊन लगेच नागपुरसाठी पोलिस टीम रवाना झाली. नागपुर रेल्वे स्थानकाच्या समोर असलेल्या उड्डाण पुलाजवळील गणेश भोजनालय येथे चैतन्यला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: aarvi nagpur vidarbha chaitanya missing boy find at nagpur railway station