गर्भपाताच्या गोळ्या विकणारी महिला अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

अकोला - गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विकणाऱ्या संध्या रमेश चांदेकर हिला येथे सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुरुवारी (ता. 13) दुपारी 12 वाजता अकोला येथे टॉवर चौकात करण्यात आली.

चांदेकर ही गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विकत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांना मिळाली होती. तिला जाळ्यात अडकवण्यासाठी डमी महिला तयार करून गर्भपाताच्या गोळ्या घेण्यासाठी चांदेकरशी संपर्क साधला. आरोपीने टॉवर चौकात येण्यास सांगितले. तेथे तिला अटक केली. तिला याबाबत विचारणा केली असता प्रथम तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर आरोपी महिलेच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरात ऑक्‍सिटोनिश इंजेक्‍शनासह इतर औषधांचा साठा आढळून आला.

Web Title: Abortion tablet Seller Women Arrested Crime