esakal | Lockdown : ग्रामीण भागात अर्थचक्राला गती; ‘नॉन रेड झोन’मधील नागरिकांना हा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

technical in akola.jpg

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत.

Lockdown : ग्रामीण भागात अर्थचक्राला गती; ‘नॉन रेड झोन’मधील नागरिकांना हा दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘नॉन रेड झोन’ असलेल्या ग्रामीण भागात 22 मेपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश काढले असून, ग्रामीण भागात आता बहुतांश व्यवहार सुरू होणार असल्यामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासही सुरू होणार आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ‘रेड झोन’ आणि ‘नॉन रेड झोन’ असे दोन भाग केले आहेत. अकोला महापालिका क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे. ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 वाजतापासून सायंकाळी 5 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आवश्यक वाचा - धक्कादायक! मस्तवाल वाळू माफियाची मुजोरी; तहसीलदारांना शर्ट फाडून मारहाण

या भागातील टाळेबंदी झाली शिथिल

 • अकोला ग्रामीण
 • अकोट
 • तेल्हारा
 • बाळापूर
 • पातूर
 • मूर्तिजापूर
 • बार्शीटाकळी

(तालुक्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्र)

हेही वाचा - अरे वा! एसटी बस धावणार, हेअर सलून उघडणार; असा ठरला 'टाईमटेबल'

अशी आहे शिथिलता

 • स्टोर्ट कॉम्प्लेक्स, खेळांचे मैदान व इतर सार्वजनिक ठिकाणे व्यक्तीगत व्यायामाकरिता खुले राहतील. तथापी प्रेक्षकांच्या एकत्र येण्यास किंवा सांघीक खेळ खेळण्यास मनाई राहिल. सर्व प्रकारच्या शारीरिक व इतर कसरती करताना सामाजिक अंतर नियमाचे पालन करणे अनिवार्य राहिल.
 • कृषी विषयक बी-बियाणे, खत विक्री, मासेमारी, पशुवैद्यकीय, वन उपक्रम, आर्थिक बाबी, सामाजिक क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक उपक्रम, मालवाहतूक, मर्यादीत व्यापारी आस्थापना, उद्योग व औद्योगिक आस्थापना.
 • ई-कॉमर्स कंपन्या, ई-कॉमर्स ऑपरेटरद्वारे वापरलेली वाहने आवश्‍यक परवानग्या चालविण्यास परवानगी राहिल. अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेरक्ट्रॉनिक उपकरणांसह सर्व वस्तू आणि वस्तुंची ई-कॉमर्स वितरण सेवा.
 • शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची बांधकामे.
 • खाजगी कार्यालये सुरू राहतील.
 • शासकीय कार्यालयांमध्ये शंभर टक्के कर्मचारी उपस्थितीसह सुरु राहतील.
 • सर्व प्रकारचे सलून, स्पा, ब्युटीपार्लर दुकाने सुरू राहतील.
 • कुरियर व पोस्ट सेवा. रेस्टारेंट व खाद्यगृह यांचे मार्फत केवळ घरपोच सेवा देता येईल.
 • सर्व बॅंकां, वित्तीय संस्था एलआयसी ही नियमित वेळेनुसार सुरू राहतील.
 • सर्व प्रकारच्या माल वाहतूक (रिकामे ट्रक) सुरू राहतील.

रात्रीची संचारबंदी कायम
जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला सायंकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत मुक्त संचार करता येणार नाही. या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध करण्यात आले आहे.

खालील अटी व शर्तींचे पालन बंधनकारक

 • सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक राहिल.
 • सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य.
 • अंत्यविधी प्रसंगी 20 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणारनाही व सामाजिक अंतराचे पालन.
 • लग्न समारंभासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक