esakal | क्रूझर ट्रॅव्हल्सच्या धडकेत १३ प्रवासी जखमी; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

Accident between travels and car in wardha district

हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील दारोडा टोलनाका परिसरात रविवारी (ता.६) पहाटे चार वाजतादरम्यान घडला.

क्रूझर ट्रॅव्हल्सच्या धडकेत १३ प्रवासी जखमी; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर अपघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : भरधाव क्रूझर प्रवासी वाहनाने ट्रॅव्हल्सला मागाहून जोरदार धडक दिली. यात क्रुझरमधील १३ प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील दारोडा टोलनाका परिसरात रविवारी (ता.६) पहाटे चार वाजतादरम्यान घडला.

राधेश्‍याम पासवान (वय १६), पप्पू कुमार (वय १६), सचिन कुमार (वय १७) कुमलन सरदार (वय ३५), छोटू सरदार (वय ३०), वीरेंद्र परवान (वय ३५), लखन सिंग (वय ६५), सुशील सरदार (वय १९), हमीद महम्मद (वय ४०), सुनील पासवान (वय ३०), महम्मद एजाज (वय ३२), वीरेंद्र पासवान (वय ३०), नरेंद्र पासवान (वय ३०) सर्व रा. दरभंगा बिहार, अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजी ०४- एनए ७७७६ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स जबलपूर येथून हैदराबादकडे जात होती. दारोडा येथील माधुरी सुपारे यांच्या शेताजवळ मागाहून येणाऱ्या एपी २५-एक्‍स ५९११ या क्रमांकाच्या क्रुझरने ट्रॅव्हल्सला मागाहून जोरदार धडक दिली. यात क्रझुरमधील १३ प्रवासी जखमी झाले.

माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रूग्णवाहिकेने सर्व जखमींना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यातील जखमींपैकी कुलमन सरदार, छोटू सरदार, लखन सिंग आणि शिवनारायण यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहे.

loading image