गडचिरोली जिल्ह्यात अपघातात सहा ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मृतांमध्ये राजू नारायण कोडापे (वय 30, रा. पेठा), तुळशीबाई राजू कोडापे (वय 26, रा पेठा), सुधाकर वासू सेना (वय 25, रा. देचली), गोंतीबाई गौरय्या आत्राम (वय 60, रा. करजेली), रमाबाई विस्तारी सिडाम (वय 55, रा. करजेली), माधुरी गोरगुंडा (वय 15, रा. पातागुडम) यांचा समावेश आहे.

गडचिरोली - आंध्रप्रदेश राज्यातील लग्नसमारंभ आटोपून स्वगावी गडचिरोली जिल्ह्यातील देचलीपेठाकडे परत येणाऱ्या नागरिकांच्या महिंद्र मॅक्‍स वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात 14 पैकी 6 जण जागीच ठार झाले. ही घटना रविवारी पहाटे 2 वाजता अहेरी तालुक्‍यातील उमानूरजवळ घडली.

वाहनाच्या चालक-मालकाचे नाव कुमरे आहे. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये राजू नारायण कोडापे (वय 30, रा. पेठा), तुळशीबाई राजू कोडापे (वय 26, रा पेठा), सुधाकर वासू सेना (वय 25, रा. देचली), गोंतीबाई गौरय्या आत्राम (वय 60, रा. करजेली), रमाबाई विस्तारी सिडाम (वय 55, रा. करजेली), माधुरी गोरगुंडा (वय 15, रा. पातागुडम) यांचा समावेश आहे.

गंभीर जखमीमध्ये लीलाबाई आत्राम (वय 45, रा. मेडपल्ली), बुचक्का श्‍यामराव तेलम (वय 40, रा. देचली), किटक्का पोरतेट (वय 43, रा. पेठा), गोसाई बोक्की पोरतेट (वय 48, रा. देचली) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर श्रेया कुकुमामा आत्राम वय 10, रा. मेडपल्ली), लक्ष्मीनारायण श्‍यामराव तेलम (वय 12, रा. पेठा), मैना श्‍यामराव तेलम वय 18, रा. पेठा), लालू वेंकय्या तेलम (वय 46, रा. पेठा), श्रेया श्‍यामराव तेलम (वय 46, रा. पेठा) व लक्ष्मी राजू कोडापे ही एकवर्षीय बालिका जखमी आहे. या अपघातात तिचे आईवडील ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

Web Title: accident in gadchiroli district; 6 dead