आईचा अनैसर्गिक अत्याचाराचा, तर मुलीचा विनयभंगाचा आरोप

file photo
file photo

अमरावती : काही वर्षांपासून परिसरातील एका दांपत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू आहे. पत्नीने पतीविरुद्ध शारीरिक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार गाडगेनगर ठाण्यात नोंदवली होती.

पोलिसांनी हे प्रकरण पती-पत्नीशी संबंधित असल्याने ते समुपदेशनासाठी महिला सेलकडे पाठविले. त्यानंतर या दांपत्यामध्ये समेट घडला. त्यामुळे पतीसह दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी टळला, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

दांपत्यामध्ये पुन्हा वाद

परंतु, पुन्हा काही दिवसांपासून गाडगेनगर हद्दीत राहणाऱ्या या दांपत्यामध्ये वाद सुरू झाला. त्यात पत्नीने गाडगेनगर ठाण्यात सहा दिवसांपूर्वी तक्रार केली. पती इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार करीत असून, दीरसुद्धा आपल्यासोबत अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. प्रतिकार केल्याने त्या दोघांनी मारहाण केली, असा आरोप पीडितेने गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केल्याने गुन्हा दाखल झाला.

काकाने अश्‍लील चाळे केल्याचा आरोप

दुसऱ्या बाजूने पीडित महिलेच्या मुलीनेसुद्धा गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यात काकाने अश्‍लील चाळे केल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्याआधारे पीडित मुलीच्या काकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अश्‍लील व्हिडिओ काढण्याची धमकी

पीडित मुलीला तिच्या काकाने अश्‍लील व्हिडिओ काढून सोशल मीडियावरून बदनामी करण्याची तसेच घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com