लॉकअपमधून पळालेल्या आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर  : अजनी पोलिस ठाण्यातील लॉकअपमधून फरार झालेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केली. निखिल चैतराम नंदनकर (27, रा. भांडेवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अजनी पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कार आणि पोक्‍सोचा गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलने 2 जुलै रोजी दुपारी अजनी हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. काही दिवसांनंतर मुलगी पोलिसांना मिळाली असता निखिलने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर निखिल पळून गेला होता.

नागपूर  : अजनी पोलिस ठाण्यातील लॉकअपमधून फरार झालेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केली. निखिल चैतराम नंदनकर (27, रा. भांडेवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अजनी पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कार आणि पोक्‍सोचा गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलने 2 जुलै रोजी दुपारी अजनी हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. काही दिवसांनंतर मुलगी पोलिसांना मिळाली असता निखिलने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर निखिल पळून गेला होता. 31 जुलै 2019 रोजी तो आपल्या घरी आला असता पाचपावली पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचदिवशी पाचपावली पोलिसांनी निखिलला अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये टाकले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त कारभार असलेल्या अजनी पोलिसांनी त्याला पळण्याची संधी दिली. लॉकअपचे दार व्यवस्थित न लावता पोलिस मोबाईलवर मग्न होते. त्या संधीचा फायदा घेत रात्री 8.45 च्या सुमारास अजनी ठाण्याच्या लॉकअपमधून आरोपीने पळ काढला. निखिल पळून गेल्याचे सर्वप्रथम महिला शिपाई वनिता जुनघरे हिच्या लक्षात आले.अजनी ठाण्यातून पळाल्यानंतर त्याने घर गाठले. आईची भेट घेतली. त्यावेळी त्याच्या आईने तू पोलिसांकडे जा, असे म्हटले. परंतु, आईकडे दुर्लक्ष करून तो रेल्वेने पवनी येथे पळून गेला. दोन दिवस पवनी येथे राहिल्यानंतर शुक्रवारी तो भिवापूर येथे मामाच्या घरी आला. मामाकडून त्याने शंभर रुपये घेतले. तेथून तो पुन्हा नागपुरात आला.निखिलला पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी हैदराबादला पळून जायचे होते. हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करण्याचे मित्राला सांगितले होते. मित्राने शनिवारी रात्रीला जाणाऱ्या रेल्वेचे तिकीटसुद्धा बुक केले होते. त्यानंतर निखिलने शेखर नावाच्या एका मित्राला फोन करून पैशाची मागणी केली होती. पैसे घेण्यासाठी तो कोतवाली हद्दीतील ग्रेट नाग रोडवरील जगदंबा सभागृहाजवळ येणार होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. लॉकअपमधून आरोपी पळाल्यानंतरही अजनी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत नव्हते, अशी चर्चा आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त नीलेश भरणे आणि उपायुक्‍त गजानन राजमाने यांनी अजनी पोलिसांच्या कार्यप्रणालीची क्षमता ओळखली. त्यामुळे स्वतःची तीन पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली. गुन्हे शाखेने प्रकरण हाती घेताच काही तासांतच आरोपी पकडला, हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused accused of escaping lockup