माउजर, काडतुसांसह आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

टेकाडी  (जि.नागपूर) राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू असताना जिल्ह्यातील निवडणुका निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी बेकायदेशीर व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. यादरम्यान कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत गोंडेगाव वेकोलि वसाहतीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्‍तीस बुधवारी (ता. 25) अटक करण्यात आली. आठवड्यातील अवैध अग्निशस्त्राची दुसरी कारवाई गुन्हे शाखेकडून करण्यात आल्याने स्थानीय पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे.

बुधवारी (ता. 25) दुपारी कन्हान परिसरात गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना वेकोलि वसाहत गोंडेगाव येथील सदनिकांमध्ये राहणारा आरोपी पंचरतन देवाजी भेलावे (वय 50) याच्याकडे अवैधरीत्या अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली. यावर गुन्हे शाखेने आरोपीच्या घरी छापा घालून त्याच्याकडील अग्निशस्त्र (माऊजर) आणि दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. माऊजर वापरण्याचे कारण विचारता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पथकाने आरोपीकडून देशी बनावटीचे स्वयंचलित माऊझर (किंमत 50 हजार) तर दोन नग जिवंत काडतुसे (किंमत 1,000) रुपये असा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली व कन्हान पोलिसांच्या स्वाधीन केले.ही कार्यवाही ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सचिन मत्ते, राजेंद्र सनोडीया, नाना राऊत, गजेन्द्र चौधरी, महेश जाधव, नापोशी दिनेश आधापुरे, रामा आडे, सुरेश गाते व चालक साहेबराव बहाळे यांनी पार पाडली. तीन दिवसांनंतर गुन्हे शाखेकडून कन्हान हद्दीअंतर्गत अवैध माउजर वापरण्यावर दुसरी कार्यवाही करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The accused arrested with mouzars, cartridges