"त्या' आरोपींना दोषमुक्त का केले? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - दोन वर्षांपूर्वी झालेल्या टोळीप्रमुखाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने भरबाजारात दिवसाढवळ्या गोळ्या घालून सचिन प्रकाश सोमकुंवर (वय 38) नामक गुंडाची हत्या केली. प्रकरणातील आरोपी अंकित पाली, अशफाक ऊर्फ बिट्टू आणि सूरज याला दोषमुक्त का केले? याबाबत पोलिसांनी एका आठवड्याच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. 

प्रकरणातील उपरोक्त आरोपींच्या दूरध्वनी रेकॉर्डवरून त्यांना दोषमुक्त करण्याचे कारण पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, यावर याचिकाकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. तसेच भरबाजारात कुणी तिऱ्हाईक व्यक्ती गोळ्या झाडत असेल त्याला बाजारातील दुकानदार ओळखण्याचा प्रश्‍नच नसल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले. यानुसार आरोपींबाबत दाखविलेल्या सहानुभूतीपूर्ण वागणुकीबद्दल पोलिसांना एका आठवड्यात उत्तर सादर करायचे आहे. सचिनची आई मीना सोमकुंवर यांनी दाखल केलेल्या या याचिकेत सचिनचे मारेकरी राजकीयदृष्ट्या सक्षम असल्याने प्रकरणाचा तपास अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे हत्येचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे सोपविण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. 

पोलिसांच्या कार्यशैलीवर संशय निर्माण होत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला. याबाबत सचिनच भाऊ संदीप याने पोलिस आयुक्तांकडे 18 ऑक्‍टोबर रोजी मेलद्वारे आणि 19 ऑक्‍टोबर रोजी लेखी तक्रार केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट तक्रार दिल्यानंतर पाच दिवसांच्या आत घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये संदीप आणि त्याचा मित्र विपिन यांना आरोपी म्हणून पकडण्यात आले. तसेच "तुमको भी वो मार देंगे' अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत पोलिसांनी तपास करावा याबाबत मूलभूत प्रशिक्षण देण्याचे निर्देश आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येते का, याची विचारणा याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली. 

Web Title: The accused have been acquitted