esakal | अमरावतीतील माधवनगर दरोड्याचा सुगावा लागेना; वर्धेत गेलेले पोलिस पथक परतले

बोलून बातमी शोधा

Accused of Madhavnagar robbery in Amravati not found}

दरोडेखोरांनी सोबत आणलेली दुचाकी माथने यांच्या घरासमोर उभी ठेवून पळून जाताना रस्त्यावर दुसऱ्या दुचाकीस्वारावर हल्ला करून त्याच दुचाकीने लुटारू पसार झाले होते. याच कालावधीत लुटमारीची घटना वर्धेत सुद्धा घडली होती. वर्धा पोलिसांनी त्यात दोघांना अटक केली होती.

अमरावतीतील माधवनगर दरोड्याचा सुगावा लागेना; वर्धेत गेलेले पोलिस पथक परतले
sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : शहरातील माधवनगरात सुवर्णकाराच्या कुटुंबीयांवर सशस्त्रहल्ला करून ९० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटले गेले. या प्रकरणाचा तपास अद्यापही लागलेला नाही. राजापेठ पोलिसांचे एक पथक गुन्ह्याच्या तपासात नुकतेच वर्धा येथे जाऊन आले. वर्धा पोलिसांनी एकास अटक केली होती. परंतु, येथील माधवनगरात पडलेल्या दरोड्याच्या घटनेशी त्या संशयित आरोपीचा काहीच संबंध नसल्याची बाब पुढे आली.

दिवाळीच्या चार दिवसांपूर्वी सुवर्णकार प्रदीप माथने यांच्या घरासमोर पाळत ठेवून पत्नी घरात जाताच चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर चार लाख ८० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले होते. पत्नीच्या मदतीसाठी घरात गेलेला पती प्रदीप यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला. पळून जाण्यापूर्वी देशीकट्ट्याने हवेत एक राउंड फायर सुद्धा केला होता.

अधिक वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण

दरोडेखोरांनी सोबत आणलेली दुचाकी माथने यांच्या घरासमोर उभी ठेवून पळून जाताना रस्त्यावर दुसऱ्या दुचाकीस्वारावर हल्ला करून त्याच दुचाकीने लुटारू पसार झाले होते. याच कालावधीत लुटमारीची घटना वर्धेत सुद्धा घडली होती. वर्धा पोलिसांनी त्यात दोघांना अटक केली होती. त्यामुळे राजापेठ पोलिसांनी शहानिशा केली असता, अमरावतीच्या लुटीच्या घटनेत वर्धेत पकडलेले लुटारू सहभागी नसल्याची बाब पुढे आली.

संपादन - नीलेश डाखोरे