esakal | अचलपूर : अख्ख्या आरोग्यकेंद्राचा भार एकाच डॉक्टरवर
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

अचलपूर : अख्ख्या आरोग्यकेंद्राचा भार एकाच डॉक्टरवर

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर : मेळघाटच्या टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्राचा भार एकाच डॉक्टरवर सुरू आहे. त्यामुळे येथील रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या आरोग्यकेंद्रात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी येथील डॉक्टरांची दमछाक होत आहे. करिता येथील रिक्त असलेले डॉक्टरांचे पद तत्काळ भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रात सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पद रिक्त आहे. हे पद अद्याप भरण्यात आले नसल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोशावर प्राथमिक आरोग्यकेंद्राचा कारभार सुरू आहे. येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत 35 च्यावर खेड्या गावांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी आरोग्यकेंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र काही कारणास्तव एक डॉक्टर आरोग्यकेंद्रात गैरहजर आहे.

हेही वाचा: यवतमाळ : लस उपलब्ध असताना लसीकरणाचा वेग मंदावला

त्यामुळे एकच वैद्यकीय अधिकारी या आरोग्यकेंद्राचा कारभार सांभाळत आहेत. मात्र डॉक्टरांच्या गैरहजेरीत त्यांच्या दमतीला भरारी पथकातील डॉक्टर आहेत. रुग्णांची संख्या अधिक असल्याने कार्यरत एका वैद्यकीय अधिकाऱ्याची दमछाक होत आहे. करिता या आरोग्यकेंद्रात रिक्त असलेल्या डॉक्टरचे पद भरण्याची मागणी परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

दररोज अडीचशेच्या वर ओपीडी

टेम्ब्रूसोंडा येथील लोकसंख्या तीन हजारांवर आहे. हे गाव या परिसरात केंद्राचे ठिकाण आहे. या प्राथमिक आरोग्यकेंद्रात परिसरातील बारा उपकेंद्रांचा समावेश होतो. येथे सध्या दररोज ओपीडीमध्ये अडीचशेच्या वर रुग्णांची गर्दी होत आहे. अनेक रुग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर कधी येणार, याची वाट पाहत असतात.

loading image
go to top