स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अचलपूरचे दरवाजे बंद, कोरोनामुळे निर्णय

achalpur
achalpure sakal

अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूर (achalpur) शहरावर आजपर्यंत अनेक संकटे आलीत. तरीदेखील आजपर्यंत अचलपुरातील ब्रिटीशकालीन दरवाजे (british era doors) बंद करण्यात आले नव्हते. मात्र, कोरोना (corona pandemic) नावाच्या शत्रूने प्रशासनाला ब्रिटीशकालीन दरवाजे बंद करण्यास भाग पाडले. परिणामी अचलपूर शहरातील मुख्य मार्गावरील असलेले ऐतिहासिक तिन्ही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. (achalpur door closed first post independence due to corona pandemic)

achalpur
तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले एक तालुक्‍याचे ठिकाण आहे. अचलपूरशिवाय वऱ्हाडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असे या शहराबाबत म्हटले जाते. जैनधर्मीय इल राजाने हे नगर वसवल्याने त्याला एलिचपूर असे नाव पडले व काळाच्या ओघात त्याचे अचलपूर नाव झाले. काही काळ विदर्भाची राजधानी असलेले हे शहर बिच्छन नदी तीरावर एका परकोटाच्या आत वसलेले असून मध्ययुगीन काळात वऱ्हाडातील एक महत्त्वाचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातील वैभवाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही या शहरात विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. अचलपूर शहरात आपला प्रवेश या किल्ल्याच्या दरवाजातूनच होतो. भक्कम पोलादी तटबंदी असलेल्या या शहरात आजही त्याच्या सौंदर्याने नटलेल्या वास्तू दुर्लक्षित झालेल्या आहेत.

achalpur
भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

शहराभोवती असलेली भक्कम तटबंदी, त्यातील बुरूज व कोरीव कामाने सजलेले सहा बुलुंद दरवाजे आजही या शहराचे वैभव आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात 15 मेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली, याची अंमलबजावणी अचलपूर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य काळानंतर यावेळी पहिल्यांदा शहरातील ऐतिहासिक दरवाजे बंद करण्यात आले आहेत. अचलपूर शहरावर अनेकदा संकटे आली. मात्र, त्यावेळीसुद्धा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेले ब्रिटीशकालीन दरवाजे बंद करण्यात आले नव्हते. मात्र, कोरोना नावाच्या शत्रूने प्रशासनावर दरवाजे बंद करण्याची वेळ आणली आहे. अचलपूर शहराच्या मुख्य मार्गावर दरवाजे आहेत, त्यापैकी काही दरवाजे नामशेष झाले, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या अचलपूर शहरातील मुख्य तीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

प्रशासनाला सर्वसामान्यांचा जीव महत्त्वाचा आहे, त्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनतेनेसुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे जेणेकरून कोरोनाचे उभे असलेले संकट लवकर दूर करण्यास मदत होईल.
-मदन जाधव, तहसीलदार अचलपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com