esakal | लसीकरणाला शिस्त लावणारा 'अचलपूर पॅटर्न'ची सर्वत्र चर्चा ; वैद्यकीय अधिक्षकांनी लढवली शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणाला शिस्त लावणारा 'अचलपूर पॅटर्न'ची सर्वत्र चर्चा ; वैद्यकीय अधिक्षकांनी लढवली शक्कल

लसीकरणाला शिस्त लावणारा 'अचलपूर पॅटर्न'ची सर्वत्र चर्चा ; वैद्यकीय अधिक्षकांनी लढवली शक्कल

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर ः शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, सांगूनी गेले रथी-महारथी किंचीतसी शक्कल लढवा, जे हवे ते मिळते जगती, या म्हणीप्रमाणे जर आपण समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला तर निश्‍चितच शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल, यात काही शंका नाही. अशीच अनोखी शक्कल अचलपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी लढवली आहे. या युक्तीचा परिणाम म्हणून लसीकरण केंद्रावरील गर्दी ओस पडली आहे. त्यामुळे या अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप

जुगाड हा भारतीयांचा आत्मा आहे. कोणताही प्रश्‍न असू द्या त्याला सोडवण्यासाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हाच आपला नेहमीचा ध्यास राहिला आहे. प्रत्येक समस्येवर काय काय उपाय करता येईल, हे भारतीय नित्याने शोधत असतो मग त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने युक्ती करतो, अशीच युक्ती उपजिल्हा रुग्णलयातील लसीकरण केंद्रावरील गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी लढवली आहे. त्यांच्या या युक्तीमुळे उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राच्या ठिकाणची गर्दीमुळे होणारा गोंधळ कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात 1 मेपासूूून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. या वयोगटातील संख्या अधिक असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्‍यता आहे, त्यातून संसर्ग वाढण्याची भीती आहे, हे लक्षात घेऊन अचलपूर येथील उपजील्हा रुग्णालयात लसीकरणाचा अनोखा पॅटर्न राबवला जात आहे. या पॅटर्ननुसार लसीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींनी केंद्राबाहेर ठेवलेल्या एका डब्यात चिठ्ठी टाकायची आणि शांतपणे घरी जायचे, त्यानंतर फोन आला की लसीकरणासाठी यायचे, अशी ही पद्धत आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

या अनोख्या युक्तीमुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी तर सोडाच रांगाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे एक मेपासून सुरू झालेल्या 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर हा पॅटर्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे. परिणामी लसीकरणाचा हा पॅटर्न अत्यंत यशस्वी ठरला असून राज्यभरातील लसीकरण केंद्रांना दिशा देणारा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image
go to top