Achalpur : जन्म दिला रजनीने, पालन केले सरलाने!

मेळघाटात दातृत्वाचा परिचय; स्वतःचे दुःख विसरून बाळाचा सांभाळ
care baby
care babysakal

अचलपूर : भगवान श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला, तर त्यांचे पालनपोषण यशोदाने केल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती मेळघाटातील भिलखेडा गावात पाहायला मिळाली. भिलखेडा येथे राहणाऱ्या रजनीने मुलीला जन्म तर दिला, परंतु तिचे पालनपोषण सरलाने केल्याचे वास्तव समोर आले आहे.

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा गावात रजनी राहते. प्रसूतीत जोखमीची शक्यता असल्याने मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता नागले यांच्यासह आरोग्यसेविका हिना सौदागर, प्रवीणा धाकडे, आशा सेविका भुरय तोटे यांनी रजनी गर्भवती राहिल्यापासून सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या. ११ मे रोजी रजनीची प्रसूती झाली.

ज्यात तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, काही महिन्यातच त्या महिलेच्या अंगावर दूध नसल्याने नवजात अर्भकाचा जीव धोक्यात आला होता. याबाबत रजनीची नातेवाईक सरला हिला कळले. दुर्दैवाने सरलाचे बाळ जन्मानंतर सातच दिवसांत दगावले होते. त्यामुळे सरलाने कोणताही विचार न करता त्या बाळाला स्वतःचे दूध पाजण्याचा निर्णय घेतला. सरलाने घेतलेल्या एका योग्य निर्णयामुळे आज ते बाळ दीड वर्षाचे झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com