esakal | तंबाखूची होळी! तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

action against 7 tobacco sellers in gadchiroli district

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ व पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले. खर्रा, तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. 

तंबाखूची होळी! तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७ दुकानांवर दंडात्मक कारवाई

sakal_logo
By
मिलिंद उमरे

कुरखेडा (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील पुराडा येथे पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या मोहीम राबवत गावातील सात दुकानांची तपासणी केली. दरम्यान सातही दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करीत ३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण मुद्देमालाची होळी करून पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ व पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले. खर्रा, तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. 

पानठेले सुरू करून व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे सक्त आदेश असतानासुद्धा अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत आहेत. गावात छुप्या मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिस व मुक्तिपथच्या तालुका चमूला मिळताच संयुक्तरीत्या दुकानांची तपासणी केली.

जाणून घ्या - नोकराला चाळीस हजार रुपये पगार देणाऱ्या ‘बावाजीला’ अटक; गुन्हे शाखेच्या कारवाईवर संशय

दरम्यान सात दुकानांमध्ये सुगंधित तंबाखू, गुडाखू, खर्रा, नस आदी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्या दुकानदारांकडून एकूण ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची होळी करीत गावात पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. ही कारवाई पुराडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एस. गोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गणेश भर्रे, रवी उसेंडी, अवकाश मितनवरे यांनी केली. 

संपादन - अथर्व महांकाळ