खामगावातील 'मॅनेज' जुगार रेडची वरिष्ठांकडून चौकशी !

police
police

खामगाव : शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका ऑइल मिल मध्ये अक्षय तृतीयेला जुगार रेड मॅनेज झाल्याचे प्रकरण आता जिल्हा पोलीस मुख्यालया पर्यन्त पोहोचले असून वरिष्ठांनी या प्रकरणात चौकशी आदेश दिले आहेत. त्यामुळे चिरीमिरी करून प्रकरण रफादफा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अक्षय तृतीयेला जुगार खेळण्याची प्रथा आजही अनेक ठिकाणी सुरू आहेत. मात्र जुगार हा कायद्याने गुन्हा असल्याने चोरून लपून ताश पत्त्यांचे डाव रंगत असतात. खामगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा असाच डाव सुरू होती. विशेष म्हणजे या डावात शहरातील मालदार असामी, व्यापारी सुध्दा होते. दरम्यान सूत्रांनुसार शिवाजी नगर पोलिसांनी ऑइल मिलमध्ये सूरु असलेल्या या जुगाराची माहिती मिळाली. जुगार रेड सुध्दा करण्यात आली. मात्र जुगारी बडे मासे असल्याने प्रकरण मॅनेज झाले. मात्र भिंतीला कान असतात या उक्ती प्रमाणे ही चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू झाली. काही स्थानिक वर्तमानपत्रात तशा आशयाच्या बातम्या सुद्धा प्रकाशित करण्यात आल्या. त्यानंतर आता हे प्रकरण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ संदीप पाटील भुजबळ यांच्या पर्यंत पोहोचले आहे. दरम्यान त्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. खामगाव येथील अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक हेमराज राजपूत या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती आहे. दरम्यान श्री.राजपूत यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सकाळ शी बोलतांना सांगिंतले. 

या प्रकरणाची माहिती घेत आहे. पोलीस विभागाची प्रतिमा मालिन हॊईल असे कृत्य खपवून घेतल्या जाणार नाही. कोणी दोषी असल्यास कारवाई करण्यात येईल. 
-  डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com