पाच महिन्यांत पाच हजार गुन्हेगारांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

नागपूर : शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी राबविलेल्या वेगवेगळ्या अभियानांमुळे पाच महिन्यांत तब्बल चार हजार 800 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. यामुळे गुन्हेगारी कमी झाली असून, यात गुन्हे शाखेची महत्त्वाची भूमिका आहे.
गुन्हे शाखेची कमान अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी सांभाळल्यानंतर गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर थेट कारवाईचे प्रमाण वाढले. अनेक गुन्हेगारांची ओळख परेड सुरू झाली. कोणता गुन्हेगार सध्या काय करतो, याबाबत अपडेशन घेणे सुरू झाले. त्यामुळे प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांचा "वॉच' असल्याचे लक्षात आल्यामुळे गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या.

ऑपरेशन वॉशआउटअंतर्गत शहरातील अवैध दारूविक्री, शस्त्र बाळगणे, खंडणी वसुली आणि हप्ता वसुली तसेच चेनस्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे गुन्हेगारीत पाऊल ठेवणाऱ्यांना चांगला धडा शिकवला गेला. अनेकांनी गुन्हेगारीतून काढता पाय घेत लहानसहान व्यवसाय टाकून उदरनिर्वाहाकडे वाटचाल केली आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. मात्र, गुन्हे शाखेने मोहीम राबवून 2 हजार 522 दारूविक्रेत्यांवर कारवाई केली. सोबतच जुगारअड्डे चालविणाऱ्यांमध्ये एकप्रकारची चुरस लागली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहिती काढून जुगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला. यामुळे जुगारअड्डेही बंद झाले आहेत. 17 गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. चार टोळ्यांवर मोक्‍काअंतर्गत कारवाई केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken on five thousand criminals in five months