खुशी हत्याकांड ट्‌विटमुळे अभिनेत्री तापसी पन्नू ट्रोल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

नागपूर : खुशी परिहारच्या निर्दयी खुनाला प्रेम असल्याचे सांगून वादग्रस्त ट्‌विट करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. या सर्व वादाला "कबीरसिंग' चित्रपटातील एका प्रसंगावर बॉलिवूडमध्ये सुरू असलेला वाद कारणीभूत आहे.

नागपूर : खुशी परिहारच्या निर्दयी खुनाला प्रेम असल्याचे सांगून वादग्रस्त ट्‌विट करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. या सर्व वादाला "कबीरसिंग' चित्रपटातील एका प्रसंगावर बॉलिवूडमध्ये सुरू असलेला वाद कारणीभूत आहे.
खुशीची नुकतीच प्रियकराने गाडीच्या जॅकने निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये याकरिता दगडाने ठेचून तिचा चेहराही विद्रूप केला होता. मात्र तिच्या हातावर गोंदलेल्या टॅटूने पोलिसांनी तिचा प्रियकर अश्रफ अफसर शेख यास अटक केली आहे. दोघेही काही वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. मध्यंतरी तिचे आणखी दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध असल्याचा संशय अश्रफला होता. त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले. केळवदजवळ सावळी गावात अश्रफने निर्दयीपणे खून करून तिचा मृतदेह फेकून दिला होता. या खुनाचा उल्लेख करून तापसी पन्नूने हिंसक प्रेमाचे समर्थन करणारे कबीरसिंग चित्रपटाचे दिग्दर्शक यांना ट्‌विटरवरून टोला हाणला.
खुशी आणि अश्रफ यांच्यात खरे प्रेम होते. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. त्याने केलेले कृत्य खुशीवरील प्रेमाला मान्यता देणारे आहे का? असा सवाल करीत खुशीच्या खुनाच्या बातमीवर तापसीने ट्‌विट केले. तापसीला कबीरसिंगचा दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यास टार्गेट करायचे होते. मात्र त्याकरिता खुशीच्या खुनाचा हवाला दिल्याने हे ट्विट तापसीवरच उलटले आहे. ज्यांना भावना नाही, त्याग कळत नाही त्यांनी माझ्या ट्‌विटकडे दुर्लक्ष करावे, असा सल्लाही तापसीने दिला आहे. या ट्विटला दहा हजार लाइक्‍स तर सुमार साडेचार हजार युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Taapsee Pannu Troll, due to the tweet of khushi parihar