

Amravati Adani Hydropower Project Sparks Protest as Villagers Fear Loss of 593 Acres of Forest and Wildlife Habitat
sakal
अमरावती : कामापूर-आडनदी परिसरात अदानी समुहाच्या वतीने १५०० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प झाल्यास ५९३ एकर वनक्षेत्रावरील वृक्ष, जैवविविधतेची साक्ष देणारी वनसंपदा नष्ट होणार असल्याने या प्रकल्पाचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासंदर्भात खोज संस्थेचे अॅड. बंड्या साने व अर्जुन युवनाते यांनी बुधवारी (ता. २३) पत्रपरिषदेत माहिती दिली. आदिवासींचे विस्थापन आणि उपजीविकेला धोक्यात आणणारा हा प्रकल्प आहे.