
आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारची भूमिका मांडून विरोधकांचा समाचार घेतल्याचे दिसून आले. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन दिवसांत सभागृहात होणारा गोंधळ बघत आहे. विरोधी पक्षाकडून घालण्यात येणाऱ्या गोंधळाने मुद्यावर चर्चा होताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळे आमदार विधानसभेत आलेलो आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्र माहिती आहे. येथील युवकांच्या हाताला काम हवे आहे. मात्र, सध्याची शिक्षणपद्धती लक्षात घेता, त्यांना रोजगार मिळणार नाही.
नागपूर : विरोधी पक्षाकडून गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात केवळ गोंधळ सुरू आहे. असे म्हणतात की, "कीचड मे कमल खिलता है' पण आधी "कीचड' करा व नंतर कमल खिलवा, ही भूमिका बरोबर नसल्याचे शिवसेना युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार "कॉमन मिनिमम प्रोग्राम'वर आधारित असले तरी, ग्रामीण आणि शहरी भागातील विकासासाठी "कॉमन मॅक्झीमम प्रोग्राम' हाच मुख्य एजेंडा असल्याचे मत शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना व्यक्त केले.
पहिल्याच भाषणात विरोधकांचा समाचार
आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारची भूमिका मांडून विरोधकांचा समाचार घेतल्याचे दिसून आले. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन दिवसांत सभागृहात होणारा गोंधळ बघत आहे. विरोधी पक्षाकडून घालण्यात येणाऱ्या गोंधळाने मुद्यावर चर्चा होताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळे आमदार विधानसभेत आलेलो आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्र माहिती आहे. येथील युवकांच्या हाताला काम हवे आहे. मात्र, सध्याची शिक्षणपद्धती लक्षात घेता, त्यांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शिक्षणपद्धती आणि त्यातील साधनसुविधांमध्ये बदल घडवावा लागेल. समान दर्जा, समान शिक्षण गावपातळीवर पोहचवावे लागणार आहे.
शाळांमध्ये र्व्हच्युअल क्लासरूम, डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. याशिवाय प्राथमिक आरोग्याच्या सुविधा, जिल्हास्तरावर रुग्णालये आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालये तयार करण्यात येईल. यातील सर्वात महत्त्वाचा घटकाला किमान किमतीत जेवण देण्यासाठीच दहा रुपयांत थाळी आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी देत महाराष्ट्राला पुढे नेण्याची वचनपूर्ती या अभिभाषणातून करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
अधिक माहितीसाठी - #NagpurWinterSession : राजकीय भूकंप होणार, एकनाथ खडसे देणार भाजपला धक्का?
भाजप आमदारांची वेलमध्ये घोषणाबाजी
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यात लागू करू नये अशी मागणी आमदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत केली. यावरून भाजप आमदारांनी घोषणाबाजी करीत वेलमध्ये गोंधळ घातला. नागरिक सुधारणा विधेयक लोकसभा व राज्यसेत पारित झाला आहे. अशा स्थितीत आमदार अशोक चव्हाण यांनी राज्यात हा कायदा लूान करू नये असा प्रस्ताव मांडला. या विधेयकावरून देशात व महाराष्ट्रात निदर्शने होत असल्याने त्यांनी सांगितले. यावर सुधीर मुनगंटीवर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. "संविधान का यें अपमान नही सहेगा हिंदुस्तान' आशा घोषणा देण्यात आला. गोंधळ वाढल्याने दाहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी - "नहले पे दहला' : गरिबांसाठी ठाकरे सरकार करणार हे
अधिवेशनात दोन दिवसांपासून विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिक सुधारणा विधेयकावरून पहिला दिवस गाजला. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याच्या मागणीवरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तिसऱ्या दिवशीची सुरवातही याच मुद्द्यावरून झाली. भाजप आमदारांनी पायऱ्यांसमोर आंदोल करीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.